NCP Ulhasnagar News : ...म्हणून उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल!

NCP Ulhasnagar District President News : विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हा सर्व बनाव करण्यात येत असून '' खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याची प्रतिक्रिया भरत राजवानी यांनी दिली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP Ulhasnagar District President Bharat Rajwani : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष भरत(गंगोत्री)राजवानी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री पावणे एकच्या सुमारास गणेशोत्सव मंडळासमोर झालेल्या राड्यात एक जण जखमी झाला होता, याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

मधूबन चौक रोड, गोलमैदान येथील विश्वराजा गणेशोत्सव मित्र मंडळ समोर तरुण उद्योजक क्रिश बजाज यांची गाडी खराब झाल्याने ती उभी करण्यात आली होती. तेंव्हा 'राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत(गंगोत्री)राजवानी यांचा मुलगा पुरब याने मागून येवून गाडी बाजुला का घेत नाही? म्हणुन क्रिश यांच्यासोबत वाद केला.

तसेच भरत राजवानी, पुरब राजवानी, रोहित गमलाडु, साहील पवार,अनिल धामेजानी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनी क्रिशला शिवीगाळी करून संगनमताने लाथा बुक्क्याने मारहाण केली, तसेच भरत राजवानी यांनी फिर्यादीला आपल्या ताब्यातील चाकुने व आरोपी साहील पवार याने आपल्या ताब्यातील स्क्रू ड्राईव्हरने मारून दुखापत केली.' अशी तक्रार श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले क्रिश बजाज यांनी केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Mahayuti News : मिटकरींच्या ट्विटनं महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; म्हणाले, "शिंदेंच्या काही मंत्र्यांना..."

घटनेची माहिती समजताच उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे,पोलीस निरीक्षक गुन्हे गोडसे,सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांनी घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असून क्रिश बजाज यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Pune Crime News
Rohit Pawar : 'विचार सोडला म्हणून अजितदादांना धोका मिळाला', रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे करत आहेत.या संदर्भात भरत(गंगोत्री)राजवानी यांच्याशी संपर्क साधला असता, क्रिश याला साधं नख लागण्याची किंवा खरचटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हा सर्व बनाव करण्यात येत असून हा खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याची प्रतिक्रिया गंगोत्री यांनी व्यक्त केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com