सोमय्या पित्रा-पुत्राच्या अडचणी वाढणार ; गुन्हा दाखल, अटक होणार?

सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kirit Somaiya, neil Somaiya,
Kirit Somaiya, neil Somaiya, sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सेव्ह विक्रांतच्या नावाखाली भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेव्ह विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा केले. या कटाचे प्रमुख सूत्रधार देशद्रोही सोमय्याच आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यानी केला आहे. तर पुरावे द्या सोमय्यांचे राऊतांना आव्हान दिले. त्याचवेळी राऊत यांनी राज्यपाल कार्यालयाने जी माहिती दिली आहे, ती काय खोटी आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी अभियान सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit Somaiya, neil Somaiya,
दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे ; वाद पेटला, पुतळ्याचे दहन

निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही अशी तक्रार फिर्यादी बबन भोसले यांनी दाखल केली होती. त्याची दखल घेत किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे कुठे गेले, हा घोटाळा ५७ कोंटीचा नव्हे तर १०० कोटींपेक्षाही जास्त असल्याची शंकाही राऊतांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जर केंद्रातील ईडी आयकर, सीबीआय या तपास यंत्रणा पारदर्शक असतील तर त्यांनीही या प्रकरणाचा तपास करावा, हा पैसा जमा झाला नाही तर, कुठे गेला, पैसा कुठे वापरला गेला, याचा सखोल तपास करावा अशी मागणीही यावेळी संजय राऊतांनी केली आहे.

Kirit Somaiya, neil Somaiya,
MNS:राज ठाकरे 'उत्तरसभे'त काय बोलणार ; संदीप देशपांडेंनी दिलं उत्तर..

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती.आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com