दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे ; वाद पेटला, पुतळ्याचे दहन

महाराष्ट्रात जर त्यांच्या या वक्तव्यानंतर दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे असतील, असा इशारा मुस्लिम कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

जालना : ''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत.

जालन्यात ही मनसे कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून पठण केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे आणि मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर जालन्यात ही महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या रामभाऊ राऊत चौकात हनुमानाचे 25 फूट उंच पोष्टर लावून जोरदार घोषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून, कार्यकर्त्यांकडूनआरती करण्यात आली.

Raj Thackeray
MNS:राज ठाकरे 'उत्तरसभे'त काय बोलणार ; संदीप देशपांडेंनी दिलं उत्तर..

त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाच पठण केले होते. यांचा निषेध म्हणून आज मुस्लिम कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका परिसरात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा अध्यक्ष रवी राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषबाजी केली.

Raj Thackeray
राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं ; मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चिघळला..

महाराष्ट्रात जर त्यांच्या या वक्तव्यानंतर दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे असतील, असा इशारा ही यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत पुण्यात मनसे 'खळखट्याक' करणार आहेत. पण या दरम्यान दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.

पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. आज या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com