Mumbai News : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाला तीन वर्षे झाली. मात्र या प्रकरणी अजूनही ठोस माहिती बाहेर आली नाही. १४ जून २०२० सुशांतने राहत्या घरी सुशांतने आत्महत्या केली होती. सुशांत हा विषय सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येतो. सुशांतचे चाहते त्याला न्याय कधी मिळणार अशी विचारणा करत असतात. (Latest Political Marathi News)
सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची मॅनेजर असलेली दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केल्याचे वृत्त आले होते. यामुळे सुशांतच्या या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. याच विषयी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवा खुलासा केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. देवेंद्र फडणवीस सुशांत सिंग रजपूत प्रकरणी होणाऱ्या तपासावर एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, "सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. पुरावे जमा झाले, ते आम्ही उजेडात आणू. जेव्हा काही लोकांनी आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही कारवाई करा असे म्हंटले होते. त्यामुळे याप्रकरणी सीबीआयने ते पुरावे जमा केले आहेत. त्याची आता तपासणी सुरू आहे. या जमा केलेल्या पुराव्यांमध्ये काही तथ्य आढळल्यास, त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे."
आम्ही काही रेकॉर्डिंगही केले आहे. यासंदर्भात काही पुरावे ही गोळा केलेले आहेत. याची तपासणी होत आहे. कोणत्याही गोष्टीवर तातडीने काही भाष्य करणं, चुकीचे ठरेल. असे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागील तीन वर्षांपासून सुशांत मृत्यूप्रकरणाचा तपास होत आहे. दरम्यान सोशल मीडियावरील त्याचे चाहते न्यायाची मागणी करत, याविषयी प्रश्न उपस्थित करत असतात. (Devendra Fadnavis On Sushant Singh Rajput Death Case)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.