DHFL घोटाळ्यात मोठा मासा CBI च्या जाळ्यात; अंडरवर्ल्डच्या हस्तकाला अटक

DHFL | या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे पुढे येण्याची शक्यता
Ajay Navander News, DHFL Scam News Updates
Ajay Navander News, DHFL Scam News UpdatesSarkarnama

मुंबई : बहुचर्चित डीएचएफएल घोटाळा (DHFL Scam) प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली असून या घोटाळ्याशी संबंधित कारवाईत अजय नवंदर याला मुंबईतून अटक केली आहे. अजय नवंदर हा अंडरवर्ल्डचा हस्तक असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या कथित ३५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील पैसे नवंदर याने छोटा शकिल आणि दाऊद इब्राहिमला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. (CBI Arrest Ajay Navander from mumbai in connection with the dhfl)

दरम्यान, या प्रकरणाचे काही राजकीय धागेदोरे शोधण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नवंदर याने भारताबाहेर पाठवलेला हा पैसा भारताविरोधातील कारवायांसाठी वापरण्यात आला असावा असा दावा करत याचा दृष्टीने पुढील तपास सुरु असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.(DHFL Scam News Updates in Marathi)

डीएचएफएल घोटाळ्याच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा सीबीआय आता शोध घेत आहे. दरम्यान नवंदर हे काही राजकीय नेत्यांच्या जवळचे असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास आता अंडरवर्ल्डपर्यंत येवून पोहचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com