CBI will investigate the palghar sadhu murder case : पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या झालेल्या हत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टि्वट करीत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. "पालघर साधू हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा महाराष्ट्र पोलीसांवर अविश्वास आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचे अपयश आहे," असे सावंत यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
हि घटना २०२० मध्ये घडली होती आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालायने २९ मार्च रोजी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला परवानगी दिली होती.
न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. याप्रकरणी दोन आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यास कोणतीही कायदेशीर गुंतागुंत राहणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
२०२० मध्ये या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विरोध केला होता. आता शिंदे सरकारने त्याला आक्षेप नसल्याचे म्हटले आहे.
शशांक शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. ११ जून २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि सीबीआय यांना नोटीस बजावली. जुना आखाड्यातील मृत साधू आणि साधूंच्या नातेवाईकांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस संशयाच्या भोवऱ्यात असल्याने महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या तपासावर विश्वास उरलेला नाही, असे याचिकांमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.