सोमय्यांनी शब्द खरा केला; अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्याची ऑर्डर आणलीच

शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena)नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांना केंद्रीय पर्यावरण खात्याकडून जोरदार धक्का बसला आहे. दापोलीमधील साई रिसॅार्ट पाडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार करत पाठपुरावा केला होता.

Anil Parab, Kirit Somaiya
करोडोंचा चुना लावणारा विशाल फटे अन् त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ता विकणार

परब यांच्या दापोलीतील रिसॅार्टच बांधकाम बेकायदेशीरच आहे. तसेच सीआरझेड (CRZ) कायद्दाचे उल्लंघन करून परब यांनी हा रिसॅार्ट बांधला. त्यामुळे सोमय्या यांच्या मागणीला यश येऊन हा रिसॅार्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. त्याच बरोबर अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचेही सांगितले आहे.

त्या मुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे अनिल परबही अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध केंद्र सरकार वाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, अनिल परब यांचेही रिसॉर्ट पाडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सोमय्या यांनी परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणारच असा दावा केला होता. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते. त्यानंतर सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे देखील या संदर्भात तक्रार केली होती.

Anil Parab, Kirit Somaiya
नितेश राणे राहिले बाजूला अन् निलेश राणेंचीच पोलिसांशी बाचाबाची

या प्रकरणी अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमेय्यांना एकतर माझी माफी मागावी लागेल किंवा १०० कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीचे उत्तर दिले आहे. सरकारने ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे, त्यांना नोटीस दिली आहे, असे परब यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com