Mumbai Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या स्थगितीला आव्हान; हायकोर्टात याचिका दाखल

Petition in Mumbai High Court : या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai University and Mumbai High Court
Mumbai University and Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्यामुळे चांगलेच राजकारण तापलेले असतानाच आता सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याची ही कृती बेकायदेशीर असल्याचे या याचिकेत म्हटले असून ही याचिका सामाजिक कार्यकर्ते ॲड.सागर देवरे यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता यावर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai University and Mumbai High Court
Mumbai University Senate Elections: 'सिनेट'वरून राजकारण तापलं; मुंबई विद्यापीठात युवासेनेचा चार तास ठिय्या

९ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आली होती. 10 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार, अशा तारखा देखील विद्यापीठाकडून जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ही निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली.

ही निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन देखील केले होते.यानंतर आता सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mumbai University and Mumbai High Court
Mumbai University Senate Elections : आदित्य ठाकरे-अमित ठाकरे भिडणार ; मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कस लागणार

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राजकीय दबावापोटी स्थगित करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. जाहीर झालेली निवडणूक स्थगित करण्याची मुंबई विद्यापीठाची कृती बेकायदेशीर असल्याचा दावा करत या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com