Chandrakant Patil : भाजप नेत्यांना नेमकं काय झालंय? आता चंद्रकातदादा म्हणाले,फुले, आंबेडकरांनी....

Chandrakant Patil : भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil Latest News : भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. पण त्यांना शाळा सुरु करताना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर,त्यांनी लोकांकडे भीक मागितली अन् शाळा सुरु केल्या असं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या विधानामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पैठण येथील एका कार्यक्रमात चंद्रकात पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शाळांच्या सरकारी अनुदानावर भाष्य केलं. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही शाळा सुरु केल्या. पण त्यांना शाळा सुरु करताना सरकारनं अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे शाळा चालवतोय, पैसे द्या अशा शब्दांत भीक मागितली. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत असे पाटील म्हणाले.

Chandrakant Patil
Governor Bhagat Singh Koshyari Resignation : कोश्यारींना 11 डिसेंबरनंतर मिळणार नारळ?

राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.याचदरम्यान भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार प्रसाद लाड, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आधीच विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडत जोरदार टीका देखील केली होती. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांवरील विधानांमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर झळकले 'ते' बॅनर, चर्चांना उधाण

तुम्ही मंत्रीपदासाठी काय भीक मागितली...अमोल मिटकरींचा संताप

भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभागातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. भीक मागितली म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तुम्ही मंत्रीपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहिती आहे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य महापुरुषांचं अमपान करणारं आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याची योग्य वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com