Governor Bhagat Singh Koshyari Resignation : कोश्यारींना 11 डिसेंबरनंतर मिळणार नारळ?

Governor Bhagat Singh Koshyari News : कोश्यारींच्या विरोधात राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत.
Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Bhagat Singh koshyari, Governor maharashtraSarkarnama
Published on
Updated on

Bhagat Singh Koshyari On Chhatrapati Shivaji Maharaj : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या वक्तव्यामुळेही राज्यभरात गदारोळ झाला. तर यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हणत सारवासारव केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यावर भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अनेकदा टीकेचे धनी झाले. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोश्यारींना नारळ मिळू शकतो, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोश्यारी यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक विरोधी पक्षाचे नेते त्यांना त्यांच्या पदावरुन हकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Shahajibapu Patil Audio Cilp : 'गावात धिंंगाणा करा...बापू काय येडा आहे का?' : शहाजीबापू पाटलांची पुन्हा डायलॉगबाजी

कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. त्यामुळे गुजरात निवडणुका पार झाल्यानंतर कोश्यारींची हकालपट्टी होईल, असा अंदाज विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लावला होता.

पवार म्हणाले होते, "राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ५ डिसेंबर नंतर कारवाई होण्याची शक्यता आहे. ५ डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे आणि ८ डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागणार" असल्याचं ते म्हणाले होते.

Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर झळकले 'ते' बॅनर, चर्चांना उधाण

"गुजरातच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यपालांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. जे वक्तव्य करतात त्यांना देखील आपल्या महाराष्ट्रात राहायच नाही. तेच म्हणत आहे, की बस हो गया अभी मुझे जाना है, तो जाने दो.. असं पवार म्हणाले होते.

मात्र आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ११ डिसेंबरला पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ११ डिसेंबरनंतर राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह भाजपने (BJP) केवळ राज्यपाल अधोरेखित केले आहेत. तर मंत्री लोढा व त्रिवेदींना मात्र पिंजऱ्याच्या बाहेर ठेवले आहे. याचा अर्थ सरळ आहे की कोश्यारींना हटवून वातावरण निवळायचे व समाजभावना आपल्या बाजूला घेण्याचे नियोजन आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत. (Governor Bhagat Singh Koshyari News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com