निवडणुकीत दोन वेळा आपला पराभव झाला. तरीही भाजपकडून आपल्याला ऑफर असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. अक्कलकोटमधील बोरोटी येथे झालेल्या हुरडा पार्टीवेळी पक्ष-कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना Sushilkumar Shinde नी हा गौप्यस्फोट केला. ही ऑफर नाकारल्याचेही शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 तारखेला महाराष्ट्रातील सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी देशातील या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे हस्तांतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची भाजपची तयारी आहे. भाजपचे सोलापूरचे दोन खासदार अपयशी ठरले. म्हणून भाजप नेत्यांनी मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. आमच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यामुळे आम्ही नकार दिला, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केला. मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसने मला न्यायालयातील चपराशीपासून देशाचे मोठे पद दिले, हे मी कधी विसरणार नाही. काँग्रेसचे दिवस सध्या वाईट असले तरी लवकरच हे दिवस बदलतील. मधल्या काळात भाजपचे अनेक नेते आपल्याला भेटून गेले. प्रणिती आणि मी भाजपमध्ये यावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आम्ही भाजपमध्ये जाणार, अशा अफवाही पसरवल्या गेल्या. मात्र, काँग्रेस आमची आई आहे आणि प्रणिती शिंदे याच पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार, असेही शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील गेल्या तीन दिवसांपासून सोलापूरमध्ये मुक्कामी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आयोजिलेल्या बैठकांना चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.