PM Modi On Chandrayaan 3: भारतासाठी अविस्मरणीय क्षण ! : 'चांद्रयान-3' ची चंद्रावर यशस्वी लँडिंग; पंतप्रधान मोदींनी 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

PM Narendra Modi Reaction On Chandrayaan 3 Landing: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला
Pm Modi - Chandrayaan 3
Pm Modi - Chandrayaan 3Sarkarnama

Delhi News: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-3' ची चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाली आहे. त्यामुळे भारतासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. 'चांद्रयान-3'च्या यशस्वी लँडिंगमुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व इस्त्रो आणि देशातल्या सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत कौतुक केले आहे. भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

'चांद्रयान-3' मधील लँडरचे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग झाले आहे. चंद्रावर यशस्वीपणे लँड होणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. अंतराळाच्या इतिहासात भारताने हा नवा इतिहास रचला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना मोदींनी ब्रिक्समधून सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.

Pm Modi - Chandrayaan 3
Wardha Talathi Bharti Exam: वर्ध्यात तलाठी भरतीच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच संशयाच्या भोवऱ्यात

"मी सध्या ब्रिक्समध्ये आहे. मात्र, प्रत्येक भारतीयांसारखे माझे मन देखील 'चांद्रयान -3' मध्ये गुंतलेले आहे. यासाठी ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानतो. 140 जनतेला कोटी-कोटी धन्यवाद देतो. ज्या ठिकाणी कुणीही गेले नाही तेथे आपण गेलो, आपल्या शास्त्रज्ञांचे परिश्रम प्रेरणादायी आहेत", अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

Pm Modi - Chandrayaan 3
Lok Sabha 2024 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडचे 'निकाल' ठरविणार पुढचा पंतप्रधान? काय आहेत राजकीय समीकरणे?

ज्यावेळी आपण इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अद्भुत आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या आशेचा आहे. हा क्षण नव्या उर्जेचा असून नव्या भारताचा आहे, असेही मोदी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com