मुंबई : अमरावती (Amarawati) हिंसाचारावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी आपली भुमिका मांंडली आहे. यासोबत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरेही ओढले आहेत. अमरावतीत होणारा हिंसाचार थांबण्यात सरकारला अपयश येत आहे का असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सुरवातीला बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. संजय राऊत यांचे विधान ऐकून किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत लगावली असती, अशा शब्दातं त्यांनी संजय राऊतांना फटकारले आहे.
त्रिपुरात जे घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना पाहिले. अमरावतीत शांतता राखण्यासाठी भाजपने बंदचे आवाहन केले होते. नागरिकांनी बंदला पाठिंबाही दिला, पण आंदोलकांचा उद्रेक झाला, मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला, आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.
“तुम्ही राज्य करा. मुस्लिमांची मतंही मिळवा. पण पाच टक्के मुस्लीम गडबड करतात. या मुस्लीम नेत्यांच्या 5 टक्के मुस्लिम नेत्यांच्या चिथावणीला बळी पडलेले लोक हिंसक आंदोलने करतात, त्याचा निषेध करा ना! मुस्लिमांच्या मतांसाठी हे सगळं करताय? त्यावर तुम्हा काही बोलणार नाही का, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटलांनी विचारला. पण सरकारने हे सर्व थाबंण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मते जातील, राजकारणात आल्यावर याचे गणित कळेल. असा खोचक टोला त्यांनी लगावला.
याच वेळी त्यांनी राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नुकतेच आजारातून उठले आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटल मध्ये आहेत. पण बाहेरुन काम करणारे आहेतच की, असेही त्यांनी नमुद केले.
तुम्हाला झोपताना, उठताना भाजपा दिसतो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप भाजपने सुरू केला, शेतकरी पैसे भाजपने थांबवले, आरोग्या विभागाचा पेपक भाजपने फोडला, काय चेष्टा चालवली आहे, असेही त्यांनी विचारले. आता जर सगळीकडे भाजपचा हात आहे असं तुम्ही म्हणत, मग तुमचे 3 पक्षांचे सरकार समर्थ आहे ना? मग भाजपचा हात कापून काढा, तुम्हाला कोणी अडवलं, तुम्ही तिघेही दुबळे आम्ही श्रेष्ठ आहोत, असे थेट आव्हानही त्यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.