नव्या सरकारमुळे  मुंबई महापालिकेत फेरबदल ?

मुंबई महापालिकेत चार वैधानिक समित्या, सहा विशेष समित्या आणि 17 प्रभाग समित्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी दावा केल्यास या समित्यांचे वाटप होईल.
Mumbai municipal corporation
Mumbai municipal corporation

मुंबई :  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्यामुळे आता मुंबई महापालिकेतही फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेबरोबर असलेली युती तुटल्याने भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात विविध समित्यांचे वाटप होण्याची शक्‍यता आहे.


मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या कॉंग्रेसकडे आहे. या पदावर भाजप दावा करण्याची शक्‍यता आहे. तसे पत्र मुंबई भाजप अध्यक्षांनी महापौरांना पाठवावे लागेल. विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीची विनंती करण्याची तरतूद महापालिकेच्या कायद्यात आहे. महापौरांनी संमती दिल्यास सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा होईल.

भाजपचे गटनेते मनोज कोटक खासदार म्हणून निवडून गेल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी नव्या गटनेत्याची निवड करावी लागेल. नवनिर्वाचित गटनेता विरोधी पक्षनेता होईल.


मुंबई महापालिकेत चार वैधानिक समित्या, सहा विशेष समित्या आणि 17 प्रभाग समित्या आहेत. राज्यातील सत्तेत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी दावा केल्यास या समित्यांचे वाटप होईल; त्याबाबतचा फॉर्म्युला पक्षांचे नेते ठरवतील. त्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल. जानेवारी ते एप्रिल या काळात या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

उपमहापौर निवड धोक्‍यात
राज्यातील सत्ता समीकरण मुंबई महापालिकेत लागू करायचे झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस उपमहापौरपदावर दावा करू शकते. तसे झाल्यास नुकतीच झालेली उपमहापौरपदाची निवडणूक रद्द होऊन फेरनिवड होऊ शकते.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com