वाझे माफीचा साक्षीदार होताच देशमुख झाले मुख्य आरोपी ; CBIकडून आरोपपत्र दाखल

अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे तर त्यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे.
Anil deshmukh news in Marathi, Sachin Waze News
Anil deshmukh news in Marathi, Sachin Waze Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला आता माफीचा साक्षीदार झाला आहे. वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशमुखांवर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (cbi)ने आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे. (Anil deshmukh news in Marathi)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या बरोबरीने या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे सहआरोपी आहे. सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार होण्याला हरकत घेणारी कुंदन शिंदेंची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज मंजूर केला आहे. आता ७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत वाझेच्या या सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जाईल.

दुसरीकडे 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण देशमुख यांच्याविरोधात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (cbi) आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण 59 पानांचे आरोपपत्र असून यात अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आले आहे तर त्यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे.

Anil deshmukh news in Marathi, Sachin Waze News
मलिक, देशमुखांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला..

सचिन वाझे 100 कोटी वसुली प्रकरणी माफीचा साक्षीदार होताच CBI ने कथित 100 कोटी वसूली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय.

गेल्या 3 महिन्यांपासून सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणी सुनावणी पुर्ण होताच CBI ने आरोप पत्र दाखल केलंय. मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सचिन वाझे याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावा असा अर्ज केला होता त्यावर 25 मे रोजी CBI आपले म्हणणे मांडत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर 1 जूनला माननीय न्यायालयाने या अर्जावर आदेश देत सचिन वाझेला माफीचा साक्षिदार बनवले.

Anil deshmukh news in Marathi, Sachin Waze News
ठाण्यात भाजप आमदाराने सत्ताधाऱ्यांना दाखवला ईडीचा धाक
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल 2021 या दिवशी दुपारी चार वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केला होता.

  • एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. तर सीबीआय प्राथमिक तपासात अनिल देशमुख यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले होते.

  • एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED ने गुन्हा दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात ED ने हा एफआयआर दाखल केला होता.

  • सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास केला होता त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com