Sharad Pawar News : 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद का नाकारलं? भुजबळांचा उल्लेख करत पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar On Shivsena, Ncp : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आहे. पण कार्यकर्ते सोबत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.
chhagan bhujbal sharad pawar
chhagan bhujbal sharad pawarsarkarnama

Mumbai News, 19 May : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Ncp ) स्थापनेपासून आजपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवता आलं नाही. शरद पवार यांच्यासारखं दिग्गज नेतृत्व मिळूनही पक्षाला एकहाती सत्ता मिळवली नाही, यावरून विरोधक डिवचत असतात. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, तेव्हा मुख्यमंत्रिपदाची संधी गमावल्याची खंत वेळोवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत मोठं विधान केलं आहे.

2004 मध्ये छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपावले असते, तर पक्षात उभी फूट पडली असती, असा गौप्यस्फोट शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, "2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचापूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे ( Ajit Pawar ) मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो."

"राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आहे. दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी बाहेर गेलीत. मात्र, सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत तर हे अधिक जाणवते. प्रचारासाठी राज्यभर दौरे केले तेव्हा कार्यकर्ते बरोबर असल्याचं लक्षात आलं. नेतेमंडळी गेली असली तरी आम्ही नवीन कार्यकर्त्यांकडे नेतृत्व सोपविले. त्यांचे परिणाम दिसू लागले आहेत," असंही शरद पवारांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले होते?

"2004 साली मुख्यमंत्रिपद सोडायला नको होतं ही एक मोठी चूक मला वाटते. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांना मुख्यमंत्री करायचं होतं. किंवा वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. मात्र, 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी आले असते, तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता," अशी खंत वेळोवेळी अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com