Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! छगन भुजबळ नाराज; भाजप नाही तर ठाकरे गटाच्या संपर्कात?

Sanjay Raut And Milind Narwekar : खासदारकीसाठी डावलल्याने छगन भुजबळ पक्षनेतृत्वावर नाराज आहेत, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी राऊत आणि नार्वेकर यांची भेटीला महत्त्व आले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : सध्या छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भुजबळांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. या भेटीनंतर भुजबळ भाजपात नाही तर शिवसेनेच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, स्वतः भुजबळांनी मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टीकरण दिलेले आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाची मोठी पडझड झाली. दरम्यान, लोकसभेचे तिकीट मिळाले नाही. त्यानंतर राज्यसभेतही डावलल्याने छगन भुजबळ पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी राऊत आणि नार्वेकर यांची भेटीला महत्त्व आले आहे.

भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर छगन भुजबळ हे विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहेत. त्यामुळे छगन भुजबळ Chhagan Bhubal यांची पुन्हा एकदा शिवसेना पक्षात घरवापसी करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांशी प्राथमिक बोलणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Chhagan Bhujbal
Rupali Patil : तब्बल 350 दिवसांनंतर अजितदादांच्या फायरब्रँड नेत्या रूपाली पाटलांनी डागली भाजपवर तोफ

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आपले पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा केला आहे. सोबतच स्वतःसाठी येवला विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी, शिवसेना ठाकरे गटाने येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात पक्षाचे स्थानिक नेते कुणाल दराडे हे संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये हा वादाचा मुद्दा बनू शकतो.

Chhagan Bhujbal
Sanjay Raut : राऊतांनी राजकारणात आणला ट्विस्ट; म्हणाले, ...तर भुजबळ 'मुख्यमंत्री'पदाचा टिळा लावूनच बाहेर पडले असते!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com