Rupali Patil : तब्बल 350 दिवसांनंतर अजितदादांच्या फायरब्रँड नेत्या रूपाली पाटलांनी डागली भाजपवर तोफ

Ajit Pawar NCP VS BJP : आपला पक्षच महायुतीचा भाग असल्याने रूपाली पाटलांनी भाजपबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपबाबत असलेली आपली भूमिका बाजूला ठेवत शांत राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
Rupali Patil
Rupali PatilSarkarnama

Pune Political News : मनसेत असताना रूपाली पाटील ठोंबरे यांनी कायमच भाजपवर कडक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी भाजपची धुलाई कायम ठेवली. मात्र, सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिल्यानंतर त्यांनी सुमारे वर्षभर आपली तोफ शांत ठेवली. आता भाजपच अजितदादांना लक्ष्य करत असल्याचे पाहून रूपाली पाटील-ठोंबरेंनी पुन्हा ट्रॅकवर येत भाजपचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2 जुलै 2023 रोजी अजित पवार बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर पुण्यातील रूपाली पाटील ठोंबरे यांनीही अजित पवार गटासोबत जाण्याची निर्णय घेतला. आपला पक्षच महायुतीचा भाग असल्याने रूपाली पाटलांनी भाजपबाबत नरमाईची भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपबाबत असलेली आपली भूमिका बाजूला ठेवत शांत राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. मात्र तब्बल 350 दिवस भाजपबाबत शांत असलेल्या रूपाली पाटलांनी आता पुन्हा आपली तोफ बाहेर काढल्याचे दिसून आले.

भाजपची मातृ संघटना अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायजर मुखपत्रातून अजित पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली. राज्यात पुरेशे संख्याबळ असतानाही भाजपने अजित पवारांना सोबत घेतले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचा आरोप मासिकातून करण्यात आला. त्या आरोपाची री ओढत भाजपच्या काही नेत्यांनीही अजितदादांवर तोंडसुख घेतले.

Rupali Patil
Video Vasai Crime : माणुसकीचा मुडदा पडला! वसई हत्याप्रकरण; विरोधकांचा संताप; सरकार पुन्हा 'बॅकफूट'वर?

या टीकेनंतर भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवार यांच्यामुळे मतसंख्या वाढण्यात मदत झाल्याचे सांगून टीकेवर पडदा टाकण्याचे काम केले असले तरी ही बाब अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि 'आरएसएस'च्या टीकेला प्रत्युत्तर देताना रूपाली पाटील यांनी भाजपमुळेच अजित पवारांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.

महायुतीत आल्याने भाजपची 'ब्रँड व्हॅल्यू' कमी झाले नसून वाढले आहे. अजित पवारांची सोबत केल्याने भाजपचे काहीही नुकसान झालेले नाही. उलट देशासह राज्यातही भाजपविरोधात वातावरण होते. शेतकरी, मागासवर्गीय, मुस्लिम वर्ग भाजपवर नाराज आहेत. त्याचाच फटका अजित पवार गटाला बसला आहे, असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी भाजपची धुलाई केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rupali Patil
Chhagan Bhujbal Politics : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणास भुजबळ समर्थकांचाही सक्रिय पाठिंबा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com