Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्याआधी भुजबळ 'सिल्व्हर ओक'च्या दिशेने निघाले.
तेव्हापासून भुजबळ अजितदादांकडे नाराज आहेत, ते अजितदादांची साथ सोडून पवारसाहेबांकडे जातील, पवार-भुजबळ भेटीत काय घडणार, त्यानंतर मीडियापुढे भुजबळ काय बोलणार याचे तर्कवितर्क काढले गेले.
भेटीनंतर मात्र भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) आपली बाजू मांडली आणि राजकीय भेट नसल्याचे सांगून भेटीवरच्या चर्चांना फटकारले. परंतु, आरक्षणाच्या मागणीवर ओढावलेल्या स्थितीवर पवारसाहेबांसोबत चर्चेसाठी भेट घेतल्याचे भुजबळांनी उघडपणे सांगितले.
एवढेच नव्हे; तर सध्याच्या स्थितीत आपण मार्ग काढू शकता, तशी क्षमता आपल्याकडेच असल्याचे सांगून भुजबळांनी पवारसाहेबांवरच आता भरवसा दाखवला. परिणामी, राजकीय वळणावर भुजबळांनी पवारसाहेबांवर अनेकदा शाब्दीक हल्ले चढवले. त्यानंतर याच भुजबळांनी आरक्षणावरून उठलेले वादळ शमविण्याची ताकद पवारसाहेबांकडे असल्याचे दाखवून देत, आपला सारा भरवसा दाखवून, तो उघडपणे बोलून दाखविल्याने त्याची चर्चा होणार हे नक्की.
भुजबळ अन् शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?
छगन भुजबळांनी म्हटलं, "मी शरद पवार ( Sharad Pawar ) यांची वेळ न घेताच 'सिल्व्हर ओक'वर गेलो होते. पण, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते झोपले होते. त्यामुळे मला दीड तास थांबावं लागलं. त्यानंतर तब्बल दीड तास आम्ही चर्चा केली. मी राजकारण करण्यासाठी, आमदार, मंत्री किंवा कुठली पक्षीय भूमिका घेऊन आलो नाही. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही ( शरद पवार साहेब ) केलं. राज्यातील काही जिल्ह्यांत स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये आणि ओबीसी, धनगर, वंजारी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं शरद पवारांना सांगितलं."
"राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापाठीला देताना मराठवाडा पेटला होता. अशावेळी तो शांत करून सरकारचं काय होईल ते होईल, मात्र मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं पाहिजे, अशी भूमिका तुम्ही (शरद पवार) मांडली होती. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तुम्ही दिलं, अशी आठवण शरद पवारांना करून दिली," असं भुजबळ म्हणाले.
"आज मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं असताना तुम्ही ( शरद पवार साहेब ) सर्वपक्षीय बैठकीला आला नाही. त्यावर शरद पवारांनी म्हटलं, 'मुख्यमंत्री जरांगे-पाटलांना भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली आणि आश्वासन दिली, याची आम्हाला माहिती नाही. ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय म्हणाला? याची माहिती नाही.' मात्र, हाके आणि उपोषणकर्त्यांना चर्चा करून मार्ग काढण्यास आम्ही सांगितलं. परंतु, जरांगे-पाटलांना कुणी मंत्री भेटले, त्यांनी काय आश्वासनं दिली, हे मला माहिती नाही. याबाबत तुम्ही ( शरद पवार साहेब ) मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे सर्व समाज घटकांची माहिती तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री आणि मुख्यमंत्री झालो, तरी आम्हाला सगळा अभ्यास आहे, असं नाही. म्हणून तुम्ही ( शरद पवार साहेब ) पुढाकार घेतला पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन-चार लोकांना घेऊन काय झालं? काय होतेय? काय केलं पाहिजे, यावर मी दोन दिवसांत चर्चा करण्यास तयार असल्याचं शरद पवारांनी मला सांगितलं," अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.