Sharad Pawar Retirement : सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट ; भुजबळ म्हणाले, "सुळे अध्यक्ष व्हायला..

NCP New chief : आपल्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Chhagan Bhujbal on NCP New chief : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. यात बैठकीत अध्यक्षपदांच्या निवडीवरुन एका तासापासून खलबते सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मोठी अपडेट समोर येत आहे. ते 'साम टीव्ही'शी बोलत होते. "राष्ट्रवादीच्या कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार तर केंद्रात देशपातळीवर सुप्रिया सुळे यांचे (लोकसभेत) काम आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अध्यक्ष व्हायला अडचण नाही," असे भुजबळ म्हणाले.

"आपल्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करा, याला त्यांनी नकार दिला आहे. पवारांनी आपला निर्णय बदलला नाही तर निर्णय घ्यावा लागेल," असे भुजबळ म्हणाले.

Supriya Sule
Sharad Pawar Retirement: पवारांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज...

शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे राजीनामे मंजुर करण्यात येणार नसल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Supriya Sule
Mohit Kamboj News : राऊतांची लायकी फक्त 50 पैसै ? ; कंबोजांकडून मानहानीचा दावा..,राऊतांना कायमच खोटे आरोप...

आज (ता. 03 मे) पक्षाचे नेते आणि मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. मी एकटा आहे. मी लोक मोजून राजकारण करत नाही. 35 वर्षांपासून राजकारणात आहे, पण हे कधीच नाही मोजले की माझ्यामागे किती लोक आहेत. त्यामुळे आजपर्यंत मी जी कोणती भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य केली आणि नंतर पक्षाने देखील ती भूमिका मान्य केल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून सांगण्यात आले. अनिल पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com