Mohit Kamboj News : राऊतांची लायकी फक्त 50 पैसै ? ; कंबोजांकडून मानहानीचा दावा..,राऊतांना कायमच खोटे आरोप...

Mohit Kamboj on Sanjay Raut : राऊतांनी कंबोज यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Mohit Kamboj News
Mohit Kamboj NewsSarkarnama
Published on
Updated on

Mohit Kamboj on Sanjay Raut : भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) हे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. याबाबत कंबोज यांनी टि्वट करीत याबाबतची माहिती दिली आहे.

राऊत यांनी तीन दिवसापूर्वी कंबोज यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर कंबोज यांनी राऊतांवर कारवाईचे हे पाऊल उचललं आहे. गेल्या रविवारी एका पबमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एक नेता गोंधळ घालत असल्याचे दिसते.

या प्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे नाव समोर आले आहे. याबाबत राऊतांनी कंबोज यांचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.

ज्या पबमध्ये मोहित कंबोज बसलेले होते. त्याठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन देखील करण्यात येते, त्यामुळे या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mohit Kamboj News
Sharad Pawar Retirement: पवारांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी, आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज...

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत कंबोजांनी राऊतांवर मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. मोहित कंबोज यांनी याबाबतचे एक टि्वट केले आहे. कंबोज यांनी एक पत्र पोस्ट केलं आहे.

Mohit Kamboj News
Sharad Pawar निर्णय मागे घ्या, पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे झळकले बॅनर ; राजीनामा सत्र..

“My Press Note On Sanjay Raut Baseless Allegations ! I Am Filling 50 Paise Criminal Defamation On Sanjay Raut क्यों की उसकी औक़ात 1 Rupees की भी नहीं है !” संजय राऊत यांची लायकी एक रुपयाची देखील नसल्याने त्यांच्यावर फक्त 50 पैशांचा मानहानीचा दावा करत असल्याचे कंबोज यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

"नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता त्या फॅमिली रेस्टॉरंटला डान्स बार म्हणून घोषित केले. राऊत यांना कायमच खोटे आरोप करण्याची सवय लागली आहे. पण यावेळी त्यांनी अत्यंत खोटे आणि चुकीचे आरोप लावले आहेत," असे कंबोज यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com