शाहरूख खान भाजपमध्ये गेला तर...! भुजबळांनी सांगितलं, काय होईल?

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन सध्या ड्रग्ज प्रकरणात तुरूंगात आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन सध्या ड्रग्ज प्रकरणात तुरूंगात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) समीर वानखेडे व भाजपवर निशाणा साधत आहेत. तर भाजपकडून आता राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात आहे. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

समता परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलताना भुजबळ म्हणाले, डॅग्ज प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन तुरूंगात आहे. शाहरूख खान भाजपमध्ये गेला तर त्या डॅग्जची साखर पावडर होईल, अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजपच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच गुजरामधील मुंद्रा बंदरावर कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडूनही तिकडची चौकशी न करता शाहरूख खानच्या मागे लागल्याचा आरोपही भुजबळ यांनी एनसीबीवर केला.

Chhagan Bhujbal
यशोमती ठाकुरांचे दातृत्व; आत्महत्या केलेल्या मुलीच्या भावा-बहिणीची जबाबदारी

भाजपने दिल्लीत जागरण करावे

ओबीसी समाजाचे राजकीय पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर लढत आहोत. (We are trying our best at all lavle for OBC reservation) विरोधक मात्र विरोधाला विरोध म्हणून आंदोलने करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांनी इथे जनजागरण करण्यापेक्षा दिल्ली सरकार समोर जागरण करावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे व त्यासाठी पाठपुरावा करणारे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अ. भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे कृतज्ञता मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

Chhagan Bhujbal
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ करावा : छगन भुजबळ

यावेळी मंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहास मांडला. ते म्हणाले, सुरवातीपासून ओबीसी समाजाला संघर्ष करावा लागला आहे. मंडल आयोगाला मान्यता मिळाल्यानंतर २०१० साली सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. त्यात ट्रिपल टेस्ट हे सूत्र मांडले. इंपिरिकल डेटाची मागणी केली. २०१७ पर्यंत याबाबत काहीच घडले नाही २०१७ साली एक व्यक्ती कोर्टत गेला आणि कोर्टाने इंपिरिकल डाटाची मागणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये होते. त्यांनी देखील एक अध्यादेश काढला आणि दुसऱ्याच दिवशी इंपिरिकल डाटा केंद्राकडे मागितला.

त्यांना देखील तो डाटा दिला गेला नाही. ज्यावेळी संसदेत समीर भुजबळ यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली होती. त्याला खुद्द स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पक्षाचा विचार न करता पाठींबा दिला होता. ओबीसींची जनगणना झाली मात्र हा डेटा जनतेसमोर मांडला गेला नाही. या डेटात खूप चुका आहेत, असे केंद्र सरकार सांगते. याच्या दुरुस्तीसाठी अरविंद पनघडिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. मात्र त्याला सदस्य नेमलेच नाही. त्यांनी देखील मग ह्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. मग या डेटातील चुका केंद्राने का दुरुस्त केल्या नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com