यशोमती ठाकुरांचे दातृत्व; आत्महत्या केलेल्या मुलीच्या भावा-बहिणीची जबाबदारी

सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी पालकमंत्री ठाकूर यांनी स्वीकारली आहे.
yashomati Thakur
yashomati Thakur Sarkarnama
Published on
Updated on

अमरावती : अमरावतीतील (Amravati) छिंदवाडीमध्ये (Chindwadi) कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने तणावात आलेल्या सतरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सेजल गोपालराव जाधव असे या तरुणीचे नाव आहे. सेजलने उचललेल्या या टोकाच्या पावलाने तिचे संपुर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जाधव कुटुंबाची भेट घेत त्यांना आधार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी सेजलच्या लहान भाऊ आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारीही उचचली. तसेच, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली.

yashomati Thakur
देगलूरच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेच पाहिजे!

मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा तालुक्यातील छिंदवाडी येथे राहणाऱ्या इयत्ता बारावीत बाराव्या वर्गात शिकणाऱ्या सेजल जाधव या विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच मंत्री अॅड. ठाकूर हेलावून गेल्या. त्यांनी तातडीने जाधव कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांची व्यथा जाणून घेत सेजलच्या भाऊ-बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व कुटुंबाला १० हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदतही दिली.

सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी अॅड. ठाकूर यांनी स्वीकारली आहे. जाधव कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू, असेही पालकमंत्री म्हणाल्या.

एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे, ही अत्यंत सुन्न करून टाकणारी घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. आत्महत्येसारखे घातक पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा इलाज नाही. संकट आले तर हार मानू नका. एकदा का जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. विद्यार्थी व तरुणांनी ‘डिप्रेशन’मध्ये जाऊ नये. हिंमत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com