Chhagan Bhujbal On Eknath Shinde : छगन भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले, 'आरक्षण अन् अभ्यास...'

Maratha Vs OBC Reservation : शरद पवार राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यातील सर्व समाज घटकांची जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर काय स्थिती आहे, याचा अभ्यास जास्त आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांची मोठी भूमिका आहे.

आता निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली. आम्ही मंत्री, मुख्यमंत्री असलो तरी आमचा सगळाच अभ्यास नसतो, असे भुजबळ म्हणाले. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले.

छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार Sharad Pawar हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. तसेच त्यांना राज्यातील सर्व समाज घटकांची जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर काय स्थिती आहे, याचा अभ्यास जास्त आहे. आम्ही मंत्री झालो आणि मुख्यमंत्री झालो तरी आम्हाला सर्वात जास्त अभ्यास आहे असे समजण्याचे काही कारण नाही, असा अप्रत्यक्षपणे टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

भुजबळांच्या विधानावर शिरसाट यांनी मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde अनुभवातून शिकत आहेत, असे सांगितले. मुख्यमंत्री वा मंत्री असो किंवा पंतप्रधान असतील, कुणालाही प्रत्येक गोष्टीचा सर्व अभ्यास नसतेच. कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. माणूस अनुभवातून शिकतो. शिंदेसाहेबही अनुभवातून शिकले आहेत. आणि ते चांगले शिकलेले आहेत, असे शिससाट यांनी भुजबळांना सुनावले.

Chhagan Bhujbal
Bhujbal Meet Pawar : साथ सोडली तरी भुजबळांचा आजही पवारसाहेबांवर लईच भरोसा

दरम्यान, आरक्षणावरून राज्यातील तिढा सोडवण्यासाठी भुजबळांनी Chhagan Bhujbal 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना दीड तास वाट पाहावी लागली. त्यानंतर पवारांशी भुजबळांनी सुमारे दीड तास चर्चा केली. राज्यात अनेकदा विविध कारणांनी वादाचे प्रसंग आले होते. त्यावेळी पवारांनीच पुढाकार घेत ते यशस्वीपणे हाताळले होते. आताही त्यांनी पुढाकार घेऊन राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवावा, अशी अपेक्षा भुजबळांची आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय ? छगन भुजबळ हे तटकरेंना जुमानत नाहीत ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com