Chhatrapati Sambhaji Maharaj News : संभाजी महाराज धर्मवीर की धर्मरक्षक ? ; नेत्यांमध्ये रंगलयं टि्वटर वॅार

Chhatrapati Sambhaji Maharaj News : आज संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दिन आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj News
Chhatrapati Sambhaji Maharaj News sarkarnama

Chhatrapati Sambhaji Maharaj News : छत्रपती संभाजी महाराज यांचा आज (सोमवारी) 'राज्याभिषेक दिन'आहे. या निमित्तानं विविध मान्यवर, संघटना,पक्षाच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. (Chhatrapati Sambhaji Maharaj latest News }

गेल्या काही दिवसापूर्वी संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) हे धर्मरक्षक की धर्मवीर याबाबत वाद रंगला होता. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'राज्याभिषेक दिना' निमित्ताने त्यांचे पडसाद अजूनही उमटत असल्याचे दिसते. आज संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दिन आहे.

हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या उल्लेख धर्मरक्षक असा केला होता. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते,या विधानावर ते अद्यापही ठाम आहे. अजित पवार यांच्या या विधानानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

पवारांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाने विविध ठिकाणी आंदोलन करीत याचा निषेध केला होता. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यानंतर आज पुन्हा समाजमाध्यमांवर संभाजी महाराज यांना अभिवादन करताना काही नेत्यांनी त्यांना उल्लेख 'धर्मवीर'असा केला आहे,

तर काहींनी त्यांचा उल्लेख "धर्मरक्षक"असा केला आहे. समाज माध्यमांवरील शुभेच्छांवर नजर टाकली तर लक्षात येते की स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर वरुन वाद रंगत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार नितेश राणे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांनी टि्वट करीत संभाजी महाराज यांनी अभिवादन केले आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj News
WEF News : दावोस परिषदेत मुख्यमंत्री २० उद्योगांसोबत इतक्या कोटींचा सामंजस्य करार करणार...

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ठाम आहेत. गिरीश महाजन यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना महाराजांचा उल्लेख धर्मवीर असाच केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनीही ट्वीट करत म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! धैर्य, शौर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता यांनी त्यांचे चरित्र सदैव तेजाने झळाळत आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व प्रेरणा देत राहील. त्रिवार मानाचा मुजरा!,असे टि्वट चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं रयतेचं राज्य हे शत्रूंच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे महाप्रतापी,महापराक्रमी,प्रकांड पंडित,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘राज्याभिषेक दिना’च्या निमित्तानं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, “आपले अतुलनीय साहस आणि धैर्याने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूविरोधात छत्रपती संभाजी महाराज यांनी कडवी झुंज दिली. स्वराज्य निष्ठेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे स्वराज्य रक्षणकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!”,

"धर्मवीर”छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४३ व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा," असे टि्वट नितेश राणे यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com