WEF News : दावोस परिषदेत मुख्यमंत्री २० उद्योगांसोबत इतक्या कोटींचा सामंजस्य करार करणार...

WEF News : दावोसला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले.
CM Eknath Shinde WEF News
CM Eknath Shinde WEF Newssarkarnama

CM Eknath Shinde : स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे वर्ल्ड ईकोनिमिक फोरम (WEF)विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रवाना झाले आहेत.या दौऱ्याला ते जाणार का नाही, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यातील आपले सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला जात नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. आज (सोमवारी) दावोस जाण्यापूर्वी शिंदेंनी टि्वट करीत आपल्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

CM Eknath Shinde WEF News
ED च्या समन्सवर चहल यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'ईडीच्या चौकशीत..'

राज्यातील नियोजित उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकार होत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोस परिषदेत उद्योगाबाबतची आपली भूमिका मांडली आहे, "या परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde WEF News
BJP Executive Meeting News : भाजपची रणनीती सुरु ; विधानसभा निवडणुकीसह या मुद्यांवर राहणार फोकस

मुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटिंग

दावोसला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'धर्मवीर आनंद दिघे चषक 2023' या क्रिकेट स्पर्धेला रविवारी एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.

CM Eknath Shinde WEF News
Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

चौकार,षटकारांची फटकेबाजी

मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या फटकेबाजी पाहून खेळाडूंनीही जोरदार जल्लोष केला. शिंदेंनी जोरदार चौकार,षटकारांची फटकेबाजी केली. टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com