Thackeray vs Shinde : ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षांची सुनावणी आता नव्या सरन्यायाधीशांसमोरच..

Thackeray vs Shinde | रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना कडक ताशेरे ओढले होते
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षांची सुनावणी लांबली आहे. या महिन्यात दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N.V. Ramanna) यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी होत आहे. त्यांनी या सुनावणीवर कडक ताशेरे ओढले होते. रमण्णा हे येत्या २६ तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे ही सुनावणी आता त्यांच्यासमोर होते की नवीन सरन्यायाधीशांच्या समोर होते, हे लवकरच समजेल.

ही सुनावणी यापूर्वी ८ आँगस्ट, नंतर १२ व आता २२ आँगस्टला ही सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरुन समजते. एन. व्ही रमण्णा २६ तारखेला निवृत्त होत आहेत. त्यांची जागा उदय लळीत घेणार आहेत. २२ तारखेला सुनावणी झालीच तर हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या विस्तारित पीठासमोर सुनावणीला पाठविण्याच्या निर्णयावरही न्यायालय आपला निकाल देईल. थोडक्यात नव्या सरन्यायाधीशांसमोरच ही सुनावणी होण्याची शक्यता वाढली आहे.

रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना कडक ताशेरे ओढले होते. शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेतून फुटलेल्या आपला ४० आमदारांचा गट हाच खरी शिवसेना व आपल्याला तशी मान्यता मिळावी असा दावा करण्यात आला होता. या दरम्यान रमण्णा यांनी शिंदे गटाबाबत, तुमची खरी शिवसेना असे म्हणणे असेल तर आधी निवडणूक आयोगाकडे का गेलात, यासारखे सवाल उपस्थित केले होते.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest News
Har Ghar Tiranga : तिरंगा फडकवताना 'या' ध्वजसंहितेचे पालन करा ; घर पोहोच मिळवा राष्ट्रध्वज

निवडणूक आयोगाला त्यांनी सुनावणी घेण्यास परवानगी नाकारल्यावर शिंदे गट, पर्यायाने भाजपच्या दिल्ली दरबारातील साशंकता वाढली होती. सूत्रांच्या माहितीनुसार कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यावर महाराष्ट्राबाबतची सुनावणी लांबणार याची कुणकूण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लागली. त्यानंतर फडणवीस-शिंदे मंत्रीमंडळाच्या विस्ताराला दिल्लीतून हिरवा कंदील देण्यात आला. मात्र घटनेच्या व कायद्याच्या कसोटीवर नेमके काय होणार याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

यापूर्वी चार वेळा नवीन तारीख मिळालेली ही सुनावणी आणखी दहा दिवसांना लांबणीवर का गेली यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत, सुनावणी सुरू असेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले.

त्यानंतर आयोगानेही आता ठाकरे गटाला कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत न्यायालयासमोर सहा याचिका आहेत. या सर्व याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील की सरन्यायाधीशांच्या समोरच याची सुनावणी होईल हे येत्या 22 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com