Karhad Satara News : शेतीच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. मात्र याची सरकारदरबारी नोंद घेतली जातेच असे नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. ९) दुपारी तीन वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) , बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, किसान जिहादीचे विनायकराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. त्यासंदर्भातील पत्र राज्य शासनाचे कार्यासीन अधिकारी अ. ज्ञा. लांडगे यांनी संबंधित नेत्यांना पाठवले आहे. त्या बैठकीस राज्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी त्यांना पिककर्ज मिळणार नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मुख्य मागणी करण्यात येणार आहे.
किसान सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा, पिक विम्यासंदर्भातील अडचणी सोडवाव्या, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीबा फुले कर्ज मुक्ती योजनेचे प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळावे, शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, यासह अन्य मागण्या या बैठकीत करणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.