Video - CM Shinde and Jayant Patil : ...अन् भर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी जयंत पाटलांना दिली महायुतीत येण्याची 'ऑफर'!

Eknath Shinde offer to Jayant Patil : जाणून घ्या, नेमकं काय घडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde offer to Jayant Patil
Eknath Shinde offer to Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेश सुरू आहे. यानिमित्त सभागृहात दररोज नवनवीन घडामोडी, किस्से घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. याशिवाय एकमेकांवर कुरघोडी करण्याची आणि टोला लगावण्याची कुणीही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

याचदरम्यान मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार असलेल्या जयंत पाटील यांना एक खुली ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं. ज्याची सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Eknath Shinde offer to Jayant Patil
Jayant Patil : संत तुकारामांचा 'तो' अभंग अन् जयंत पाटलांचे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांना चिमटे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांच्या मुद्य्यावर बोलताना जयंत पाटीलयांना(Jayant Patil) महायुतीत सामील होण्याची ऑफर दिली. 'जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, थोडं असली वाघांबरोबर या.' असं मुख्यमंत्री शिंदेंनी हसतहसत म्हणताच सत्ताधारी आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या शेजारी उपमुख्यमंत्री फडणवीसही बसलेले होते.

याआधी मुख्यमंत्री शिंदेंनी, 'छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे कधी आणणार? असं जयंतराव म्हणाले होते. ब्रिटनच्या म्युझियमशी सामजंस्य करार झाला आहे. लवकरच ही वाघनखे पाहायला मिळतील. जयंतराव या महिन्यातच वाघनखे मिळतील. त्या वाघनखांचा योग्य वापर आम्ही नक्की करू. ही वाघनखे ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवू.' असं जयंत पाटील यांना उद्देशून सभागृहात सांगितलं.

Eknath Shinde offer to Jayant Patil
Jayant Patil To Mahadev Jankar : जयंत पाटील यांनी महादेव जानकरांना थेट वंदनच केलं

याशिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या मुद्य्यावर माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश त्यांचा शालेय पोषण आहार यामध्ये कधीही तडजोड करायची नाही. त्यामध्ये कोणी जर तडजोड करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करा. कारण हे पुण्याचं काम आहे. जो त्यामध्ये दिरंगाई, भ्रष्टाचार करेल त्याच्यावर कारवाई करा.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com