Jayant Patil To Mahadev Jankar : जयंत पाटील यांनी महादेव जानकरांना थेट वंदनच केलं

Vidhan Sabha Pavsali Adhiveshan : लोकसभा निवडणुकीत महायुतीने त्यांना निवडून आणले नाही. आमच्याकडे असते निवडून आले असते.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशा या गरम वातावरणात दोन्हीही बाजूकडून विरोधी गटातील आमदारांना चुचकारण्याचे प्रयत्नही दिसून येत आहे.

अर्थसंकल्पावर चर्चेची सुरूवात करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना थेट वंदनच केले.

विधानसभा सभागृहात भाजपचे आमदार संजय कुटेंनी अर्थसंकल्पाची स्तुती केली. हा अर्थसंकल्प गावागावातील लोकांना आवडलेल्या असून तेच विरोधकांना समाजावून सांगतील, असा टोला लगावला. कुटेंच्या लांबलेल्या भाषणानंतर तालिका अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी जयंत पाटील Jayant Patil यांना बोलण्यास संधी दिली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच गॅलरीत बसलेल्या महादेव जानकर यांना वंदन करून केली.

जयंत पाटील म्हणाले, वर गॅलरीत महादेव जानकर Mahadev Jankar आले आहेत. त्यांना वदंन करूनच मी माझ्या भाषणाची सुरूवात करतो. त्यांचा आम्ही सन्मान करतो. लोकसभा निवडणुकीत महायुतीने त्यांना निवडून आणले नाही. आमच्याकडे असते निवडून आले असते, असा टोलाही जयंत पाटलांनी महायुतीच्या घटक पक्षांना लगावला. पाटलांनी जानकरांना केलेल्या वंदनाची मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Jayant Patil
Vishwajit Kadam & Anil Parab : साहेब, लक्ष असू द्या! विश्वजीत कदम यांच्या रिक्वेस्टवर अनिल परब यांनी हातच पुढे केला

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली आहे. यात रासपचे महादेव जानकर यांच्याही जागेचा समावेश आहे. मात्र महायुतीकडून जानकरांना लोकसभेत उतरवल्यानंतर विधान परिषदेत मात्र संधी देण्याचे टाळले आहे. त्यामुळे जानकर कार्यकाळ संपल्यानंतर विधिमंडळात दिसणार नाहीत. यावरून अर्थसंकल्पावर बोलताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जानकरांना वंदन केले नसेल ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Jayant Patil
Ajit Pawar and Rajesh Vitekar News : परभणीकरांना आला 'एकच वादा अजितदादा'चा प्रत्यय ; राजेश विटेकर अखेर आमदार होणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com