CM Shinde Delhi Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे कुटुंबासह दिल्लीत; पंतप्रधान मोदींची भेट घेणार

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
CM Shinde Delhi Visit
CM Shinde Delhi VisitSarkarnama

Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्याबरोबर पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे आहेत. 18 जुलैला झालेल्या 'एनडीए'च्या बैठकीला देखील मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा आज दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

रायगडच्या इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक थेट दिल्ली गाठली. त्यांचा हा दौरा नियोजित नसून ते वैयक्तिक कामासाठी दिल्ली दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

CM Shinde Delhi Visit
Mahesh Landge at Monsoon Session: महेश लांडगेंची लक्षवेधी लागली अन् उपयोगकर्ता शुल्काला स्थगिती मिळाली

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात यासंदर्भात काही निर्णय होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com