Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

'शिंदे म्हणतात, अन्यायाच्या विरोधात मशाली पेटल्या पाहिजे

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : धनुष्यबाण चिन्ह आम्ही मागितले होते. मात्र, ते आम्हाला मिळाले नाही. ज्या पक्षाकडे बहूमत असते त्या पक्षाला चिन्ह मिळते. जवळपास ७० टक्के बहूमत आमच्याकडे आहे. राज्यप्रमुख आणि अनेक कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण मिळावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना मशाल हे चिन्ह मिळाले त्या विषयी शिंदे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मशाली या अन्यायाच्या विरोधात पेटल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मशाली होत्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या नावाबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

तसेब बाळासाहेबांचे नाव आम्हाला मिळाले, त्यामुळे आमचा विजय झाला, असेही ते म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले, ''वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार….#बाळासाहेबांची_शिवसेना'' असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच नाव तात्पुरत गोठवण्यात आल्याने अंधेरी पोट निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटांकडून नवीन चिन्ह आणि नवीन नावे ही निवडणूक आयोगाकडे सुचवण्यात आली होती. यामध्ये आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मशाल चिन्ह मिळाले आहे..

Eknath Shinde
शिंदे गटात धुसफूस वाढली? मंत्रिपदासाठी आमदारांचे गुडघ्याला बाशिंग

तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले आहे. शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) असे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणतेही चिन्ह मिळालेले नाही. त्यांना आयोगाने पुन्हा चिन्हांसाठी पर्याय देण्यास सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com