CM Eknath Shinde on Opponent : 'गिरे तो भी टांग उपर' म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचलं अन् ठाकरे गटालाही लगावला 'हा' टोला!

Eknath Shinde Vs Congress : 'पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला केवळ 99 जागा मिळाल्या. 240 पर्यंत पोहचायला किती वर्ष लागतील?' असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
CM Eknath Shinde on Opponent
CM Eknath Shinde on OpponentSarkarnama

CM Eknath Shinde Press News : 'उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांनी ठकरल्याप्रमाणे या अधिवेशनात बहिष्कार घातलेला आहे. खरंतर हे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं. आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील, येतील आणि चर्चेतून बरचसं काही, चांगलं जनतेसाठी होत असतं.

परंतु त्यांची चर्चा करण्याची अजिबात इच्छा नाही. पत्रही दिलं आहे परंतु त्या पत्रात नवीन काहीच मुद्दे नाहीत.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशाच्या पूर्वसंध्येस आयोजित पत्रकारपरिषदेतून विरोधकांवर निशाणा साधला. शिवाय 'गिरे तोभी टांग उपर अशी विरोधकांची गत' असल्याचं म्हणत टोलाही लगावला.

महाराष्ट्राच्या विधिमंडळांचं पावसाळी अधिवेशन गुरुवार (27 जून) पासून सुरू होत आहे. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच हे अधिवेशन होत असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, शिंदे- फडणवीस- पवार सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले, 'आमची सभागृहात चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु त्यांची तयारी नाही. त्यांची तुमच्यासमोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल अशी नीती आहे. जी वस्तूस्थितीच नाही ते समोर आणून लोकांची दिशाभूल करायीच आणि स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची असा त्यांचा अविर्भाव आहे.'

CM Eknath Shinde on Opponent
Ajit Pawar News: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवारांचा विरोधकांवर गंभीर आरोप;म्हणाले,'खोटा नरेटिव्ह..'

याचबरोबर 'मागील वेळी मी म्हणालो होतो की अवसान गळालेलं एक अतिशय गोंधळलेला विरोधी पक्ष. यावेळी मात्र जरा तुमच्यासमोर छाती फुगवून आले असतील. म्हणाले लोकसभेत अपयश मिळाल्याने आता सत्ताधारी पोकळ अश्वासनं देतील. मात्र कोणाचं अपयश आहे? तुम्ही मोदींना हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार असा नरेटिव्ह सेट केला, आरक्षण जाणार असं सांगितलं. गावागावा जाऊन खोटा नरेटिव्ह पसरवून काही प्रणाणाता तुम्हाला नक्कीच क्षणिक आनंद मिळाला.'

तसेच 'पण एवढं करून सुद्धा 99 जागा मिळाल्या. म्हणजे तुम्हाला 240 पर्यंत पोहचायला किती वर्ष लागतील? आणखी 25 वर्षे लागतील. परंतु एवढं करून शेवटी काय झालं, नरेंद्र मोदी(Narendra Modi) तर पंतप्रधान झालेच. गिरे तोभी टांग उपर या म्हणीप्रमाणे तुमची गत झाली आहे. इथं काहीजणांची तर बेगानी शादी मै अब्दुला दिवाना अशी परिस्थिती आहे.' असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

CM Eknath Shinde on Opponent
Devendra Fadanvis News : अधिवेशनाआधीच फडणवीसांनी तापवलं वातावरण; विरोधकांना घेरण्याचाही सांगितला प्लॅन

ठाकरे गटावर साधला निशाणा! -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'उबाठा बद्दल बोलायचं झालं तर आम्ही आमने-सामने 13 जागांवर लढलो त्यापैकी सात जागा आम्ही जिंकल्या आहेत. ही आता त्यांना आलेली सूज आहे परंतु ती नक्कीच उतरेन. तुम्हाला जी काही मतं मिळाली आहेत, ती तुम्ही दिशाभूल करून मिळवली आहेत.'

'सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधक म्हणत होते की, सरकार पडणार...सरकार पडणार. मात्र सरकार मजबूत होत गेलं. अजितदादा आमच्याबरोबर आले त्यामुळे आणखी मजबूत झालं. मग काय तर मुख्यमंत्री बदलणार, यासाठीतर देव पाण्यात ठेवले होते, पण काही झालं का? आता सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. एक मजबूत सरकार महाराष्ट्राने बघितलं आहे.' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com