Thane political News : उद्धव ठाकरेंवर टीका करताना आपल्याकडे खूप नाडे आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या वक्तव्यावर आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच दाढीच्या नाड्या दोन दिल्लीश्वरांच्या हातात असल्याचा टोलादेखील लगावला आहे. याचबरोबर स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून...हा तुमचा स्वभाव आहे. ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या नाड्या कुणापर्यंत आहेत तेही जाहीर करा असे आवाहनच घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करताना संजय घाडीगावकर यांनी म्हटले आहे की, म्हणे दाढीकडे खूप नाड्या आहेत. पण दाढी महोदय, त्या नाड्यांचे एक टोक तुमच्याकडे आहे. तेही जगासमोर आणा, बरं तुमच्या नाड्या दिल्लीच्या दोन नेत्यांच्या हाती लागल्याची पण चर्चा आहे. त्या नाड्या दिल्लीश्वरांनी खेचल्या तर लेंगा खाली कोसळतो की काय अशी स्थिती झाल्याने तुम्ही बाळासाहेबांच्या कुटुंबाशी गद्दारी केल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे.' अशी टीका घाडीगांवकर यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच ठाकरे यांच्या कुटुंबाच्या जीवावर मोठं होऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाच्या नाड्या स्वतःकडे ठेवण्याइतपत तुम्ही मोठे नाहीत. तुमची तेवढी बौद्धिक उंची नाही. तुम्ही पळपुटे आणि भित्रे आहात. यंत्रणेच्या जीवावर तुमचा रुबाब आहे. ज्या दिवशी यंत्रणा हातात नसेल तेव्हा तुमच्या राजकिय नाड्या ठाणेकर जनतेने आवळलेल्या असतील. असा इशारा संजय घाडीगांवकर यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
दोन दिल्लीश्वर महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळत आहेत, येथील रोजगार गुजरातला पळवून नेऊन तरुणांच्या गळ्यात बेरोजगारीच्या नाड्या घालत आहेत आणि तुम्ही ठाकरे कुटुंबाच्या नाड्या स्वतःकडे असल्याच्या गमजा मिरवत आहात. भाजप आमदाराने तुमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. त्यात त्याने तुमच्या कारभारावर आरोप केले. त्या आरोपांच्या नाड्या कुणापर्यंत जातात हे एकदा जाहीर कराल काय? असा सवाल घाडीगांवकर यांनी केला आहे.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.