Palghar Loksabha : पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे Vs शिंदे गट असणार आमनेसामने ?, मात्र...

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे.
Shinde Vs Thackeray
Shinde Vs Thackeray Sarkarnama

Loksabha Election 2024 : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. पालघर लोकसभा मतदार संघावर सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे.

यावेळी दोन्ही काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र असल्याने पालघरची जागा ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार हे जवळ पास नक्की झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीमध्ये या जागेवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दावा दाखल केल्याने पालघर मध्ये दोन्ही शिवसेनेतच लढत होणार असे संकेत मिळत आहेत.

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव पुढे आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडे सध्यातरी आश्वासक असा चेहरा दिसत नाही. शिवसेनेचे प्रमुख नेते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे गटाबरोबर असल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून दिसून आले आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता जयवंत दुबळा आणि माजी सभापती भारती कामडी ही दोन नावे चर्चेत असली तरी यावेळी डहाणूचे आमदार विनोद निकोल यांना शिवसेने तर्फे उमेदवारी मिळू शकते असेही बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shinde Vs Thackeray
Bjp News : नवी मुंबईतील दादा-ताई ठाण्यात एकत्र येणार; निमित्त ठरलं...

लोकसभेचा रणसंग्राम लक्षात घेता हा मतदारसंघ शिंदे गटाच्या हातून घेण्यासाठी भाजपाने रणनिती आखली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही या मतदारसंघावर आपला दावा करत आहे. भाजप व शिंदे गटाचे मोठे नेते पालघरमध्ये वारंवार ये-जा करत आहेत. त्यामुळे पालघरसारखा महत्वाचा मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीने पालघरमध्ये ठाकरे गटाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे.

पालघरमध्ये काँग्रेस व शरद पवार गटाची फारशी ताकद नाही. तसेच शिवसेनेत दुफळी माजलेली असताना पालघरमध्ये ठाकरे गटालाच मतदारांची पसंती मिळत आहे. त्यामुळे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उमेदवारी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पालघरमध्ये काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही. येथून सलग पाचवेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले माजी दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर सचिन शिंगड़ा हे ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवू शकतात, वाडा, विक्रमगड या परिसरात सचिन पायलट यांच्या समर्थकांची मोठी संख्या आहे.

Shinde Vs Thackeray
Ncp News : पक्ष अन् चिन्ह गेले; आता 5 आमदार पवारांना धक्का देणार; लवकरच दादा गटात जाणार ?

पालघर जिल्ह्यातील मतदारांची मानसिकता लक्षात घेता जिल्ह्यातून जाणारे प्रकल्प व त्यात भूमीपूत्रांना वेठीस धरले जात असल्याने भाजप सरकारविरोधात येथील मतदार नाराज आहे. वाढवण बंदरासारखा प्रकल्पाला येथील जनता विरोध करत असताना तो रेटून नेण्याचा शासनाचा प्रयत्न पाहता येथील जनता नाराज आहे. भाजपच्याच उमेदवाराला मतदान करणं म्हणजे वाढवण बंदराच्या प्रयत्नांना बळकटी देणं असा एक मतप्रवाह सागरी पट्टयातून वाहत आहे.

तसेच सर्वसामान्यांना कोणताचा फायदा नसलेला बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई-वडोदरा महामार्ग यामुळे स्थानिकांच्या लागवडीयोग्य जमिनी संपादित केलेया जात असल्याने येथील जनतेत भाजप-शिंदे गटाबद्दल फारशी आस्था राहिली नसल्याचे दिसत आहे. तरी भाजपमधून माजी आमदार विलास तरे आणि संतोष जनाठे ही नावे सद्या चर्चेत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com