Eknath Shinde On Hoardings : नेत्यांच्या चमकोगिरीवर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी; म्हणाले, 'वारकऱ्यांच्या स्वागताचे..'

Eknath Shinde On Political Hoardings : पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा
Eknath Shinde On Hoardings :
Eknath Shinde On Hoardings : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आळंदी आणि देहूतून विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूकडे मार्गस्थ झालेली पालखी आता पुढच्या काही तासांमध्ये पंढरपूरात दाखल होत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी (दि. २९ जून) राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पंढरपूरात विविध राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे स्वागताचे फलक व बॅनर्स लावले आहेत. मात्र या फलक व बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाराजी दर्शवली आहे.

Eknath Shinde On Hoardings :
Shivsena (UBT) News : ठाकरे गटाची अडचण वाढणार; चव्हाणनंतर आता 'यांची' चौकशी होणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा," असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. काल (दि. २६ जून) रोजी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला.

Eknath Shinde On Hoardings :
Devendra Fadnavis On Ambedkar : “संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदूं भटजीही..,” ; आंबेडकरांच्या विधानावर फडणवीस म्हणाले..

यावेळी त्यांच्या लक्षात आले की, पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com