Eknath Shinde Appoint New whip : मुख्यमंत्री शिंदेची शिवसेना नेमणार लवकरच नवा व्हीप?

Eknath Shinde Appoint New whip : बेकायदेशीर भरत गोगावलेंची उचलबांगडी होणार?
Eknath Shinde Appoint New whip?
Eknath Shinde Appoint New whip? Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून लवकरच नव्याने आपल्या विधीमंडळ पक्षाचा नवा प्रतोद नेमणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निर्णय दिल्यानंतर आता नवा प्रतोद नेमण्याची प्रक्रिया देखील शिंदे गटाकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde Appoint New whip?
Raj Thackeray Talk With District President : मनसेचे लक्ष्य महापालिका, जिल्हा परिषद ; जिल्हाध्यक्षांकडून घेतला आढावा..

सत्तासंघर्षावर निकाल देताना न्यायालयाने विद्यमान प्रतोद भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर ठरवल्याने आता नवा प्रतोद नेमण्यात येणार आहे. याबाबतीत शिवसेनेतल्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देताना त्यांना सर्वात मोठा दिलासा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Eknath Shinde Appoint New whip?
Baramati Dudh Sangh Eelection : अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर; बिनविरोधची परंपरा कायम राहणार?

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या विधिमंडळातील प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद पदावरील नियुक्ती ही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर तात्काळ खासदार राहुल शेवाळे यांनी नवीन प्रतोदाबद्दल सुतोवाच केले होते. भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) व्हिप म्हणून निवडप्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू करू, असे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली होती.

यामुळे आता भरत गोगावले यांचीच प्रतोद म्हणून नव्या प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात येईल की, गोगावले यांची उचलबांगडी करत विधिमंडळ प्रतोदपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com