Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात केली महाआरती अन् उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला!

Kopineshwar Temple Thane : १११ फूट लांब अगरबत्ती प्रज्ज्वलित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Temple Ceremony : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह 'जय श्रीराम'चा जयघोष केला. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर ठाण्याची ग्रामदेवता असलेल्या कौपिनेश्वर मंदिरामधील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महाआरती केली.

याचदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक सोहळा कोणी पाहत असेल किंवा नसेल. पण, हा सोहळा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघे नक्की पाहत असतील, असे म्हणून नाव न घेता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला मारला आहे. महाराष्ट्र आणि अयोध्येचे एक आगळेवेगळे जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच सर्वांचे स्वप्न साकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करीत त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उचलला चांदीची गदा आणि वाजवला ढोल

महाआरतीसाठी मुख्यमंत्री मंदिरात आल्यावर त्यांनी माईक हाती घेत, श्रीरामनामाचा जयघोष केला. त्यामुळे मंदिराच्या आवारात उपस्थित असलेल्या भक्तांनी जय श्रीरामनामाचा जयघोष केल्याने जय श्रीरामनामाने मंदिर दुमदुमून निघाले.

याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी झेंडा हाती घेत तो फडकवला. तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना चांदीची गदा भेट देण्यात आला, त्यांनी ती गदा उचलली, तिचा स्वीकार केला. तसेच १११ फूट लांब अगरबत्ती प्रज्ज्वलित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

Eknath Shinde
Ram Mandir Pran Pratishtha : ठाण्यात 111 फुटांची अगरबत्ती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रज्वलन

मनसेने केली पहिली मंदिरात महाआरती -

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी अकरा वाजता ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाआरती केली. या महाआरतीला मनसेचे नेते अभिजित पानसरे आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. आरती करून ते निघून गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com