Ram Mandir Pran Pratishtha : ठाण्यात 111 फुटांची अगरबत्ती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रज्वलन

Thane eknath Shinde News : ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात 111 फुटांची अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे. सायकल या कंपनीने 23 दिवस सुगंध दरवळत ठेवणारी विशेष 111 फुटांची अगरबत्ती तयार केली. ही अगरबत्ती नैसर्गिक साहित्यांनी तयार करण्यात आली असून आगरबत्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले. ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

श्री राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कौपीनेश्वर मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेली ही अगरबत्ती तयार करण्यासाठी 18 कारागिरी दिवस रात्र झटत होते. ही अगरबत्ती 23 दिवस 500 मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. अगरबत्ती करण्यासाठी 23 दिवस काम सुरू होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे नाशिकला; मुख्यमंत्री शिंदेंनी साधला मोठा डाव...

अगरबत्ती तयार झाल्यानंतर ती मंदिराच्या आवारात उभारण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे. आगरबत्ती प्रज्वलनाआधी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य

चारकोल, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबान आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे.

Eknath Shinde
Ayodhya Ram Mandir: उद्याच्या सुटीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; याचिका फेटाळली...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com