हिंदुहृदयसम्राट, धर्मवीर हे जनता ठरवत असते; ते मागून मिळत नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Latest News : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाचा ट्रेलर लॅंाच
Dharmaveer movie trail ceremony
Dharmaveer movie trail ceremonysarkarnama
Published on
Updated on

ठाणे : आनंद दिघे आपल्यातून निघून गेले त्यावेळी त्यांचे वय होते ५० वर्ष पण दिवसात्रीचा हिशोब केला तर हा माणूस १०० वर्ष जगला. नुसताच जगला नाही तर त्यांनी अनेकांना जगवले, जोपासले, त्यामुळे या ज्या काही पदव्या, उपाध्या असतात त्या कुठल्याच कॅालेजात मिळत नाहीत. मागून मिळत नाहीत, त्या जनतेनी द्यावी लागतात. हिंदुहृदयसम्राट असेल धर्मवीर असेल, हे जनता ठरवत असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. (Uddhav Thackeray Latest News)

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाचा ट्रेलर लॅंाच सोहळा पार पडला यावेळी, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार संजय राऊत, अभिनेता सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) उपस्थित होते.

Dharmaveer movie trail ceremony
राज ठाकरेंचा अल्टिमेटम पोलिसांनी मोडीत काढला; अजिदादांचा टोला

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काही वेळा शब्द सुचत नाहीत. मला तो काळ आठवतो आहे. बाळासाहेब आनंद दिघे यांच्यावर रागवलेले होते. बाळासाहेबांना वेळ म्हणजे वेळ पण आनंद दिघे (Anand Dighe) वेळेवर यांचे नाही. बाळासाहेब रागवायचे पण जेव्हा दिघे साहेब याचे तेव्हा बाळासाहेबांचा राग शांत व्हायचा, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. त्यावेळेला मी कल्याण डोंबिवलीला गेलो होतो. तिकडची लोक म्हणाली. की दिघे साहेबांना भेट्याचे आहे. ती वेळ होती रात्री २ ते ३ ची. दिघे साहेब लोकांसाठी जगले. धर्मवीर ही दिलेली उपमा आहे. दिघे साहेब ठाणेकरांचे ह्दय होते. दिघे साहेबांची आज पण आठवण येते. निष्ठ म्हणजे दिघे साहेब, काय मागीतले त्यांनी बाळासाहेबांकडे तर काही नाही. ते फक्त शिवसैनीक होते. तुम्ही एकनाथराव एक कमाल कार्य केले आहे, असेही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आज या सिनेमाचा ट्रेलर लॅंाच सोहळा पार पडला. खर तर या चित्रपटाचे राजामौली, अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे. धर्मवीरांनी जे काम केले जी संगठणा त्यांनी बांधली, ते काम मोठे आहे. हा सिनेमा त्यांचा जीवनप्रवास आहे. प्रवीण आणि मंगेश यांनी खुप मेहेनत केली. प्रसाद ओकनेही भूमिका जबरदस्त केली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Dharmaveer movie trail ceremony
संजय राऊत म्हणाले, भोंगे आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसला...

नमस्कार आता मी पराठीत बोलतो, माझे नाव सलमान खान. मला धर्मवीराचा ट्रेलर फार आवडला. आत्ताच मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत होते. त्यांनी आनंद दिघे यांची एक गोष्टी चांगली सांगितली की जी माझ्या आणि त्यांच्यात साम्य असणार होती. ते एका बेडरुममध्ये राहत होते. मीही एकाच बेडरुममध्ये राहतो. त्यानतर मला आदित्य यांनीही एक साम्य सांगितले, त्यांचे ही लग्न झाले नव्हते आणि माझे ही झाले नाही. एक चित्रपट आधी आला होता धर्मवीर, आता हा चित्रपट येतो आहे. काही चित्रपट तितकाच चालावा तो धर्मवीर चालला होता, असे सलमान खान म्हणाला.

''दिघे साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. आज जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला आहे. निष्ठ म्हणजे काय असते हे सगळ्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून शिकले पाहिजे,'' असे संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com