संजय राऊत म्हणाले, भोंगे आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसला...

खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) भोंगे आंदोलनावर जोरदार टीका केली.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई - देशातील महागाईवरून सध्या भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) भोंगे आंदोलनावर जोरदार टीका केली. ( Sanjay Raut said, Hindus suffered the most from the Bhonge movement ... )

खासदार संजय राऊत म्हणाले, देशातील महागाई इतकी वाढली पण त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलत नाही. देशाच्या पंतप्रधानांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. मात्र देशातील जनता महागाईशी युद्ध करत अशा उपरोधिक शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भोंग्यांवर कसले बोलता महागाईवर बोला, असे आवाहनही केले आहे.

Sanjay Raut
राज यांच्या आधी रोहित पवारांचा दौरा : अयोध्येत जाऊन घेतले रामलल्लाचे दर्शन

खासदार राऊत पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, गॅस टाकी यासंदर्भात भाजपचा एकही नेता बोलत नाही. भोंग्यांसाठी सर्वसमावेशक धोरण केंद्राने तयार केले पाहिजे. भोंग्यांबाबत सर्वात जास्त हिंदू समाज नाराज आहे. हिंदू समाजात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन-कीर्तन करणाऱ्यांना या आंदोलनाचा फटका बसला आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचा कट होता. मात्र तसे होऊ शकले नाही. महाराष्ट्राची जनता सुजान आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com