सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्ष दुध पाजले! उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दुध पाजले, ते पिल्लू वळवळ करत होते आता आमच्यावरच फुत्कारात आहे, अशा शब्दाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे (BJP) नाव न घेता खरमरीत टीका केली.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्याच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिय सुळे, अनिल परब, जयंत पाटील, सुभाष देसाई, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुनिल शेळके यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Uddhav Thackeray
विधिमंडळ अधिवेशनाची रणनीती ठरली! पवारांनी बैठक घेऊन दिले आदेश

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. विकृती पेक्षा घाणेरडेपणा आहे. हिम्मत आहे तर दाऊदला शोधून का आणत नाही. तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. थडग्यांवर माथा टेकवता मग दाऊदच्या मुसक्या का आळवत नाही, असा सवाल त्यांनी केला. आज इकडे धाड पडते तिकडे धाड पाडते, याला अटक कर, त्याला अटक कर मात्र आता हे खपवून घ्यायचे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Uddhav Thackeray
कितीही गोंधळ घाला मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच!

आपली एकजूट आपली ताकद आहे. आम्ही कोणावर वार करत नाही. मात्र, वार केला तर आम्ही सोडणारही नाही. सरकार पडणार, सरकार पडणार असे सांगितले जात आहे. मात्र, माझे १७० मोहरे फोडून दाखवाच, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शरद पवार म्हणाले, उद्याच्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले आहे. तुमचे सरकार चांगले काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थ वाटते. सत्ता येते सत्ता जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतके अस्वस्थ मी पाहिले नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. सत्ता आली तर लोकांच्या साठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत-हसत सत्ता सोडायची असते. पण भाजपच्या लोकांचे वेगळे आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे. त्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, पालक आणि विद्यार्थी प्रचंड त्रास सहन करत आहेत. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. मोदी सरकारचे चार मंत्री तिकडे गेले आहेत. एकही मंत्री युक्रेन किंवा रशियात गेले नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडले नाही, असेही पवार म्हणाले.

इकडे नवाब मलिक यांना आत टाकले तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला, त्यांनी सांगितले आमच्याकडे चार लोकांना अटक झाली. मात्र, आम्ही मागे हटलो नाही लढलो संघटना वाढवली. तुम्हीही तेच करा. नगरपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी महाविकास आघाडीने केली. लोक तुमच्या बरोबर आहे, लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्याशी असलेली बांधीलकी त्यात तडजोड करायची नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com