विधिमंडळ अधिवेशनाची रणनीती ठरली! पवारांनी बैठक घेऊन दिले आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवार यांनी बैठक घेतली.
 Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मंत्री, आमदारांनी उपस्थित राहायला हवे. पक्षाच्या सर्व सदस्यांचा सक्रीय सहभाग विधिमंडळाच्या कामकाजात असावा, असे निर्देश पवार साहेबांनी बैठकीत दिले, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली.

बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

 Sharad Pawar
कितीही गोंधळ घाला मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच!

यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबतही प्रतिक्रिया दिली. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना तिथून तत्काळ देशात आणण्याऐवजी भाजपचे मंत्री आता विद्यार्थ्यांनाच दोष देत आहेत. भाजपला माणुसकी, मन, आई-वडिल यांचे दुःख समजत नाही. जेव्हा युद्धाचे ढग जमू लागले तेव्हाच विद्यार्थ्यांना आणण्याचे काम करायला हवे होते. मात्र, जेव्हा बॉम्ब पडायला लागले तेव्हा दिवसाला २५० विद्यार्थी आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला.

 Sharad Pawar
साडेचार तासात खारकीव सोडा! भारताकडून विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा

दिवसाला २५० विद्यार्थी आणले तर २० हजार विद्यार्थी आणायला किती दिवस लागतील? याचाही विचार झाला पाहीजे, असे आव्हाड म्हणाले. भारताने याआधी कुवैत, लिबिया युद्धाच्या वेळी काही लाख माणसांना कमी वेळेत मायदेशी परत आणले होते. आज युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे, केंद्र सरकारची यावर भूमिका स्पष्ट नाही, अशी टीका देखील आव्हाड यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com