SangliCorporation News : "महापालिकेमुळे 31 कोटींचा निधी परत, गैरकारभारामुळे...", भाजप नेत्याचा आरोप

Sangli Corporation Latest News : "शहरातील लोकांचा अंत पाहू नका", असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला आहे.
Sangali Corporation
Sangali Corporationsarkarnama
Published on
Updated on

महानगरपालिका क्षेत्रात नवीन सबस्टेशन उभे करायचे आहेत. परंतु, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. महापालिकेच्या ( Sangli Muncipal Corporation ) हलगर्जीपणामुळे महावितरणचा अंडरग्राउंडसाठी असलेला 31 कोटी रुपयांचा निधी परत गेला. गैरकारभारामुळे विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप भाजप नेत्या नीता केळकर ( Nita Kelkar ) यांनी बुधवारी ( 6 मार्च ) पत्रकार परिषदेत केला. पाच सबस्टेशनसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शहरातील लोकांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

Sangali Corporation
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातील दोन्ही खासदारांचे देव पाण्यात, पुन्हा उमेदवारीसाठी धडपड अन् आटापिटा

नीता केळकर म्हणाल्या, "कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने राज्य शासनाच्या वतीने महावितरणमार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. सांगली जिल्ह्यातील 28 उपकेंद्रांच्या ठिकाणी 1153 एकर जमिनीवर 186 मेगावाॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जवळपास 59 हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणार आहे. या योजनेसाठी जमीन ताब्यात घेण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात निवडलेल्या उपकेंद्रांच्या सक्षमीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"प्रधान कुसुम योजनेतून शेतकर्‍यांना 90 टक्के अनुदान तत्त्वावर सौर कृषिपंपाद्वारे वीजजोडणी सुरू आहे. पुनरुत्थान वितरण क्षेत्र योजनेतून जिल्ह्यात 2511 कोटी निधीची पायाभूत विद्युत यंत्रणा बळकटीकरण, वीजहानी कमी करणे, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी 222 कोटींची कामे प्रस्तावित आहेत. त्यात प्रामुख्याने 52 नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रे, 115 उपकेंद्रांतील रोहित्रांची क्षमता वाढ/अतिरिक्त रोहित्र उभारणी, फीडर विलगीकरण, नवीन 5 हजार 864 किलोमीटर उच्चदाब व लघुदाब वाहिनी उभारणी, 11 हजार 573 नवीन वितरण रोहित्रांची उभारणी इत्यादी कामे प्रस्तावित आहेत," असं केळकरांनी म्हटलं.

Sangali Corporation
Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

"जिल्ह्यात महावितरण कंपनीची घरगुती, कृषी आणि औद्योगिक ग्राहकांची वसुली चांगली असून, अवघी 15 टक्के थकबाकी आहे. जत, कवठेमहांकाळ तालुक्यात यंत्रणा कमी असल्याने थकबाकीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. सांगली शहर आणि जिल्ह्यासाठी सबस्टेशन उभारले जाणार आहेत. महानगरपालिका ( Sangli Muncipal Corporation ) क्षेत्रात 9 आणि मिरज, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये 2 सबस्टेशन उभारले जाणार आहेत. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने अंडरग्राउंडच्या कामांचा 31 कोटी रुपयांचा निधी परत गेला," असा आरोप केळकरांनी केला.

Sangali Corporation
Lok Sabha Election 2024 : पोरांच्या उमेदवारीसाठी उतारवयात 'बापमाणसं' मुंबईत ठाण मांडून; कोणाला मिळणार यश?

"सांगलीतून आष्टा-दुधगावला 33 केव्हीची वीज पुरवली जाते. त्यामुळे या मार्गावर कसबेडिग्रज हे सबस्टेशन महत्त्वाचे आहे. नवीन सबस्टेशनसाठी यापूर्वी कमी निधी उपलब्ध होत होता. परंतु, आता 50 ते 60 कोटी रुपये उपलब्ध झाले तर कामे मार्गी लागतील," असेही केळकर यांनी सांगितले.

  • R

Sangali Corporation
Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com