Chitra Wagh: ठाकरेंवर फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघांनी केले 'ते' ट्वीट डिलीट; नेमकं कारण कोणते?

Chitra Wagh Deletes Tweet What Is the Reason? मुख्यमंत्री फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर प्रायव्हेट जेटमधून येण्यावरुन टीका करीत असताना त्यांच्याच नेत्या चित्रा वाघ यांनी भाजप नेत्यासह प्रायव्हेट जेटमधून प्रवास करीत नागपुरातील हिवाळी अधिवेशनास येणे पसंत केले होते.
Chitra Wagh Deletes Tweet What Is the Reason?
Chitra Wagh Deletes Tweet What Is the Reason?Sarkarnama
Published on
Updated on

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. इंडिगो एअरलाईनवरुन फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. त्यावर फडणवीसांनी खोचक उत्तर दिले होते. फडणवीसांच्या ठाकरेंवर त्यानंतर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी एक टि्वट केले होते. पण हे टि्वट त्यांनी काही मिनिटांत डिलिट केले.

"उद्धव ठाकरे हे इंडिगो विमानाने येत नाही हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्याला यायला काही अडचणी नाहीत. जर ते ही नाही वाटलं तर, शिंदे साहेब आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे. वाटलं तर गाडी पाठवून देतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना रविवारी लगावला होता. समृद्धी महामार्गाने 7 ते 8 तासात नागपुरात येता येतं असेही फडणवीस म्हणाले.

या घटनेनंतर हिवाळी अधिवेशनासाठी प्रायव्हेट जेटमधून चित्रा वाघ या पोहचल्या होत्या, याबाबत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर केली होती. या चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड,सुमित वाघमोडे आणि भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बन दिसत होते. या फोटोवरुन विरोधक आपली कोंडी करु शकतात हे चित्रा वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते टि्वट लगेचच डिलिट केले.

Chitra Wagh Deletes Tweet What Is the Reason?
Babasaheb Patil: खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानं थकवले 9 कोटी; 38 कारखान्यांकडे कोट्यवधीची थकबाकी

मुख्यमंत्री फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर प्रायव्हेट जेटमधून येण्यावरुन टीका करीत असताना त्यांच्याच नेत्या चित्रा वाघ यांनी भाजप नेत्यासह प्रायव्हेट जेटमधून प्रवास करीत नागपुरातील हिवाळी अधिवेशनास येणे पसंत केले होते. उद्धव ठाकरे यांना सल्ला देणारे फडणवीस त्यांच्याच आमदारांना समुद्धी महामार्गावरुन येण्याचा सल्ला का देत नाहीत? असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे चित्रा वाघ यांच्यावर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली का? असा प्रश्न यानिमित्ताने नेटकरी विचारत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com