चोराच्या मनात चांदण : चित्रा वाघ यांचं राऊतांना प्रत्युत्तर..

शिवसेना (Shiv sena ) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपावर (BJP) टीका केली होती.
Sanjay Raut & Chitra Wagh
Sanjay Raut & Chitra Wagh Sarkarnama

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीला आयकर विभाग (IT) आणि ईडीची (ED) एवढी भीती वाटतेय. 'सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून 'चोराच्या मनात चांदणं' दिसतंय, असा टोला वाघ यांनी ट्वीटरच्या माध्यामातून राऊत यांना लगावला आहे.

Sanjay Raut & Chitra Wagh
फडणवीस वारंवार खोटे बोलून ते खरे करून दाखवण्याचा प्रयत्न करतात…

ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला भाजपकडून वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून 'चोराच्या मनात चांदणं' दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणाऱ्या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे 'अलीबाबा अन् 40 चोरांचं' सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल', असं ट्वीट करत वाघ यांनी राऊतांचा समाचार घेतला.

Sanjay Raut & Chitra Wagh
बारा आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत..

राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी वाघ यांनी तीन ट्वीट केले. त्यात वाघ म्हणाल्या की, 'सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दाराने लपत छपत पुन्हा जमा करावे लागले. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळ आपट करून उपयोग नाही. 'जैसी करणी, वैसी भरणी' असे ट्वीटही त्यांनी केले.

संजय राऊत यांनी भाजपवर केली होती ही टीका...

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोक आहेत. अतिरेकी पळून जातील. आमच्यावर ज्याप्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला केला जात आहे. या सरकारी संस्था केंद्र सरकारने बदनाम केल्या आहेत. तसेच, किरीट सोमय्यांनाही काश्मीरमध्ये पाठवा.आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. ते फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. अशी थेट टीका राऊत यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com