Chitra Wagh On Sanjay Raut : 'येथे ओशाळले लॉजिक' म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना धू-धू धुतले

Aurangzeb : निवडणुकीचं घोडामैदान जसजसे जवळ येत आहे, तसे राऊत सोईस्कर इतिहासाच्या नशेत झिंगतात.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

Maharashtra Political News : औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. औरंगजेब दिल्ली काबीज करून महाराष्ट्रावर चाल करून आला होता. त्याचप्रमाणे आजची गुजराती वृत्ती दिल्लीतून राज्यावर चालून येत असल्याचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना सर्वज्ञानी म्हणत त्यांच्या विधानांमध्ये काहीच लॉजिक नसल्याचे म्हणत समाचार घेतला आहे. Chitra Wagh On Sanjay Raut

राऊतांच्या लॉजिकवर वाघ म्हणाल्या, आता याच लॅाजिकनुसार बोलायचे तर राऊत, त्यांचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि दाऊद इब्राहिम तिघेही कोकणात जन्मले आहेत. या तिघांनीही मुंबईसह कोकणप्रांत नासवला. पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर त्याची किर्ती वाढवलेली आहे. त्यामुळे कोण कुठे जन्माला आले, यावरून तुम्ही कुठल्याच प्रांताला-राज्याला कमीपणाने लेखण्याचे कारण नाही, असे वाघ यांनी राऊतांना सुनावले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chitra Wagh
Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?

मोदी गुजरातमध्ये जन्माला आल्याचा अभिमान असल्याचेही वाघ म्हणाल्या. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला असेल, पण त्याच भूमीत महात्मा गांधींसारखे जगाला वंदनीय महापुरुषही जन्माला आले आहेत. गुजरातचा गौरव महात्मा गांधींमुळे आहे; औरंगजेबामुळे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच त्याच गुजराती भूमीने नरेंद्र मोदींसारखा (Narendra Modi) पंतप्रधान देशाला दिला आहे. ही नुसती गुजराती बांधवांसाठी नाही, तर अवघ्या भारतवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असेही वाघ यांनी सांगितले.

Chitra Wagh
Nitesh Rane on Sanjay Raut : मोदींवरील राऊतांच्या टीकेने नितेश राणे भडकले; म्हणाले, तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल....

संजय राऊत हे लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे वादग्रस्त विधाने करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. चित्रा वाघ म्हणाल्या, निवडणुकीचं घोडामैदान जसजसे जवळ येत आहे, तसे राऊत सोईस्कर इतिहासाच्या नशेत झिंगतात. त्यांच्या बुद्धीचे घोडे पेंड खाऊ लागलेले दिसते. आता वेळीच स्वतःला सांभाळा; अजून तर मोहीम सुरू व्हायची आहे. मराठी मावळ्यांनी याच मातीत दफन केलेल्या औरंगजेबाची मदत घेऊन महाराष्ट्र जिंकायची स्वप्ने बघू नका, असेही वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

बुलडाणा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेब याच्याशी केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि गुजरातला औरंगजेबाचा जन्म झाला. ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा," असे राऊत म्हणाले होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Chitra Wagh
Owaisi On Shah : 'मजलीस को उखाड के फेको गे क्या' म्हणणाऱ्या शाहांना ओवेसींचं सडेतोड प्रत्युत्तर; 'भाजपचं अस्तित्व...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com