Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?

Lok Sabha Election 2024 : स्थानिक व लिंगायत उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात येत असल्याने महायुतीला हॅट्ट्रिक साधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.
Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?
sarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील 18 उमेदवारांची यादी अंतिम झाल्याची चर्चा आहे. यापैकी काही उमेदवारांची नावे बुधवारी (ता. २०) घोषित करण्यात आली. मराठवाड्यातील राखीव असलेल्या लातूर मतदारसंघातून या वेळी काँग्रेसला डॉ. विजय काळगे यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार सापडल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

आतापर्यंत काँग्रेसला (Congress) या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागत होता. 2009 मध्ये काँग्रेसने केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला होता, परंतु जिल्ह्याचे तत्कालीन नेतृत्व विलासराव देशमुख यांच्याकडे होते. त्यानंतर मात्र काँग्रेसला लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. कोणत्याही क्षणी त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?
Lok Sabha Election 2024 : बीआरएसचे नेते अन् आंबेडकर यांच्यात बंद दाराआड खल; लोकसभेचं गणित काय?

उच्चशिक्षित शिवाजी काळगे (Shivaji Kalge) यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, स्थानिक व लिंगायत उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात येत असल्याने महायुतीला हॅट्ट्रिक साधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून महायुतीकडून खासदार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपने पुन्हा एकदा जुन्या खासदारांना (Sudhakar Shrungare) संधी दिली असली तरी त्यांच्याबद्दल नाराजी आहे. भाजपत असलेल्या दोन गटांत वाद नको म्हणून पुन्हा त्यांना संधी दिल्याचे बोलले जाते. मागील पाच वर्षांची त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यामुळे काँग्रेसकडून स्थानिक उमेदवार दिल्यास भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून येईल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?
Rohit Pawar On BJP: 'नया है वह'; मनसेचा महायुतीत सहभाग? रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पूर्वी वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना लातूरमधून उमेदवारी देण्यात यावी, असा मतप्रवाह काँग्रेसमधील एका गटाकडून होता. त्यानंतर भा. ई. नगराळे निवृत्त आय.ए.एस अधिकारी यांनाही उमेदवारी देण्याबाबत पक्षीय पातळीवर चर्चा सुरू होती. त्यातच त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेणे सुरू केले होते. मात्र, मागील काळापासून काँग्रेसला स्थानिकचा उमेदवार मिळत नसल्याने बाहेरच्या उमेदवारावर मदार होती.

शिवाजी काळगे यांचे नाव निश्चित मानले जात असून, त्यांचे नाव मागील लोकसभा निवडणुकीतही चर्चेत होते. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली. परिणामी त्यांचा दारुण पराभव झाला. या वेळी मात्र पक्षाने चूक सुधारत स्थानिक उमेदवार देण्यावर भर दिल्याचे दिसते.

शिवाजी काळगे यांचे मूळ गाव अंकुलगा-राणी (ता. शिरूर अनंतपाळ) आहे. त्यांचे वडील बंडप्पा काळगे हे पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत राहिले आहेत. पूर्वीचा निलंगा तालुका आता शिरूर अनंतपाळ तालुका आहे. त्यावेळी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य होते. माजी आमदार दिवंगत श्रीपतराव सोळुंके यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. त्यानंतर तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व कमी झाले.

जुने डॉक्टर म्हणून काळगे यांचा परिचय असून, ते नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. एक उच्चशिक्षित व बऱ्याच वर्षांपासून लातूर येथे त्यांची प्रॕक्टिस असल्याने मोठा जनसंपर्क आहे. शिवाय स्थानिक व जंगम समाजाचे ते असल्याने ही उमेदवारी भाजपसाठी जड जाणार असे दिसते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Latur Congress Politics : लातुरात काँग्रेसला स्थानिक उमेदवार सापडला; शिवाजी काळगेंचं फायनल?
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या त्या खेळीमुळे खासदार समर्थकांनी थेट एकनाथ शिंदेंना दिला कडक इशारा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com