Chitra Wagh, Supriya Sule
Chitra Wagh, Supriya Sule Sarkarnama

Chitra Wagh News : निर्भया पथकातल्या गाड्या तुम्हीही वापरल्या; चित्रा वाघांनी सुळेंना डिवचले

Chitra Wagh News : निर्भया पथकाच्या गाड्यांवरून राजकारण तापले आहे.
Published on

Chitra Wagh News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 'व्हीव्हीआयपी' कल्चर सुरु असल्याची टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातही निर्भया पथकासाठी खरेदी केलेल्या गाड्या होत्या. तुम्हीही त्या गाड्या वापरल्या मग आता हा दुटप्पीपणा कशासाठी, असा सवाल भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकाच्या निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसेच याचसंदर्भातील बातमीचा फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केले होते.

Chitra Wagh, Supriya Sule
Nirbhaya Fund Latest News: 'निर्भया'ची वाहनं शिंदे सरकार वापरतयं ; निर्भया फंड काय आहे, जाणून घ्या!

आता महाविकास आघाडी सरकारने केलेल्या या आरोपाला वाघ यांनी उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात निर्भया पथकासाठी 220 वाहने खरेदी केली होती. पण आघाडी सरकारने १२१ वाहने मुंबईतील ९४ पोलीस स्टेशनला दिली. तर ९९ वाहने आघाडी सरकारने १९ मे २०२२ ला इतर विभागांना वाटली. पण आता शिंदे-फडणीसांच्या नावाने बोंब मारतायेत. म्हणजेच 'उलटा चोर कोतवाल को डांटे असा सणसणीत टोला' वाघ यांनी विरोधकांना लगावला आहे.

इतकेच नव्हे तर ९९मधल्याही ९ गाड्या मंत्र्यांच्या दावणीला बांधल्या. या सर्व गाड्या महिलांच्या सुरक्षेसाठी वापरणं बंधनकारक होतं. याशिवाय तर यातल्या १२ गाड्या अतिमहत्त्वाच्या ताफ्यात देण्यात आल्या. यात तत्त्कालीन मंत्री छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार, सुभाष देसाई, सुनील केदार, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या ताफ्यात निर्भया फंडातील गाड्या वापरण्यात आल्या होत्या असा गंभीर आरोप वाघ यांनी केला.

Chitra Wagh, Supriya Sule
Pankaja Munde : गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगत मौन का बाळगलं? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण...

निर्भया निधीतून ही ९९ वाहने जलद प्रतिसाद, लाचलुचपत विभाग, मोटार विभाग आणि मंत्र्यांच्या ताफ्यात देण्यात आली, याशिवाय ज्या खात्यांचा संबंध नाही त्या खात्यांनाही देण्यात आल्या. आदित्य ठाकरेंच्या ताफ्यात १७ गाड्या देण्यात आल्या असा आरोप करत महाविकास आघाडीला हे करताना लाज कशी वाटली नाही, असा टोला वाघ यांनी लगावला. तसेच, आता या सर्व गाड्या परत घेण्याची प्रकिया सरु झाली आहे. येत्या आठवड्याभरात या गाड्या परत ताब्यात घेण्यात येतील असही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com