Pankaja Munde : गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगत मौन का बाळगलं? पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण...

Pankaja Munde News : गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावूक
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : भाजपचे (BJP) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) याची याची आज जयंती आहे. या निमित्त पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी गोपीनाथ गडावरुन त्यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या. तर आपण आज मौन का बाळगलं? याबाबत स्पष्टीकरण देत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांवर टीकाही केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ''मी मौन का बाळगलं हा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण ज्या ठिकाणी कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही त्या ठिकाणी हिंमतीने बोलतो तो खरा नेता असतो. तर ज्या ठिकाणी सगळे बोलतात तेथे जेथे श्रेयवादाची लढाई सुरु असते, या परिस्थितीत देखील मौन बाळगतो तोच खरा नेता असतो. हेच गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे संस्कार आहेत. काही घटनांच्या निषेधार्थ हे मौन होतं. कोणत्या व्यक्तीच्या नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात हे मौन होतं'', असं स्पष्टीकरणही मुंडे यांनी दिलं.

Pankaja Munde
Sharad Pawar Birthday : सुप्रिया सुळेंनी शेअर केली 'बाबा'ची गोष्ट..

''मी कधीच कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही. माझ्या विरोधात बोलणाऱ्यांशीही चांगलं बोलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. तुटत नाही तो पर्यंत तुटू द्यायचं नाही हे माझ्या वडिलांचे संस्कार आहेत. राजकारणातलं हे स्थान खोटं बोलून मिळवता येत नाही. पण राज्याच्या राजकारणात बोलण्याची आणि मौन बाळगण्याची हिंमत दाखवण्याची सध्या गरज आहे'', असं सांगत वडिलांची आठवण सांगताना पंकजा मुंडे या भावूक झाल्या.

Pankaja Munde
Nirbhaya Fund Latest News: 'निर्भया'ची वाहनं शिंदे सरकार वापरतयं ; निर्भया फंड काय आहे, जाणून घ्या!

तसंच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ''एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने बोलते. तेव्हा एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून टीका करणं हा देखील महापुरुषांचा अवमान करण्यासारखंच आहे. महापुरुषांबाबत बोलताना आपण त्यामधून प्रेरणा घेतली पाहिजे'', असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com